शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
3
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
4
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
5
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
6
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
7
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
8
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
9
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
10
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
11
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
12
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
13
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
14
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
15
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
16
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
17
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
18
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
19
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
20
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 

आदित्य ठाकरेंनी केले प्रफुल्ल पटेल, विश्वजीत कदम आणि श्रीमंत छत्रपती मालोजीराजेंना कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 7:23 PM

यावेळी फोटोग्राफी कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थ ठेवण्यात आलेला अत्याधुनिक कॅमेरा हाताळण्याचा मोह आदित्य ठाकरे यांना आवरता आला नाही

धनकवडी: महाराष्ट्रात ठाकरे घराणे कलाप्रेमी म्हणून ओळखले जाते. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार तर उद्धव ठाकरे छायाचित्रकार ! या दोघांचाही वारसा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे आल्याची प्रचिती भारती विद्यापीठ येथील फोटोग्राफी कॉलेजला त्यांनी भेट दिली असताना आली.

यावेळी फोटोग्राफी कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थ ठेवण्यात आलेला अत्याधुनिक कॅमेरा हाताळण्याचा मोह आदित्य ठाकरे यांना आवरता आला नाही. त्यांनी आपल्या सोबत उपस्थित असलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम आणि श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांची प्रसन्न भावमुद्रा या कॅमेऱ्याने टिपण्याचा आनंद घेतला.

स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करणे आणि कालचा, आजचा विचार करण्यापेक्षा उद्याचा विचार करणे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे मत राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. भारती हॉस्पिटलमध्ये नवीन तीन टेस्ला एमआरआय मशिन व १२८ स्लाईस आणि ३२ स्लाईस सी.टी. स्कॅन अद्ययावत सेंटरचे उदघाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार प्रफुल्ल पटेल, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, श्रीमंत छत्रपती मालोजीराजे, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, भारती विद्यापीठ मेडिकल फौंडेशनच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप उपस्थित होत्या.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेVishwajeet Kadamविश्वजीत कदमbharti universityभारती विद्यापीठ