अतिरीक्त आयुक्त करणार पहाटे पहाटे करणार आरोग्य कोठ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:00 AM2020-11-29T04:00:09+5:302020-11-29T04:00:09+5:30

पुणे : शहरातील स्वच्छतेची जबाबदारी मुख्यत्वे असलेल्या आरोग्य कोठ्यांचे कामकाज कसे चालते, निकषांप्रमाणे स्वच्छता होते की नाही हे पाहण्याकरिता ...

Additional Commissioner will inspect the health rooms in the morning | अतिरीक्त आयुक्त करणार पहाटे पहाटे करणार आरोग्य कोठ्यांची तपासणी

अतिरीक्त आयुक्त करणार पहाटे पहाटे करणार आरोग्य कोठ्यांची तपासणी

Next

पुणे : शहरातील स्वच्छतेची जबाबदारी मुख्यत्वे असलेल्या आरोग्य कोठ्यांचे कामकाज कसे चालते, निकषांप्रमाणे स्वच्छता होते की नाही हे पाहण्याकरिता पालिकेचे अतिरीक्त आयुक्तच आता पहाटे पहाटे तपासणी करणार आहेत. आरोग्य कोठ्यांना सकाळी साडेसहा वाजता भेटी देऊन पाहणी करण्यासोबतच नागरिकांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत असलेल्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या जाणार आहेत.

प्रत्येक प्रभागामध्ये एक चार आरोग्य कोठ्या आहेत. शहरात ५०० पेक्षा अधिक आरोग्य कोठ्या आहेत. झाडण काम करणा-या सेवकांपासून स्वच्छताविषयक कामे करणा-या सेवकांची हजेरी घेणे, त्यांना कामाची ठिकाणे नेमून देणे तसेच त्यांच्या कामाचे निरीक्षण आरोग्य कोठी स्तरावर होते. या कोठ्यांची जबाबदारी मोकादमांवर असल्याने त्यांनीही स्वच्छताविषयक कामांमध्ये सक्रीय असणे आवश्यक आहे. परंतु, ब-याचदा पालिकेचे कर्मचारी गणवेश घालत नाहीत. गुटखा-पान-तंबाखू खाऊन थुंकत असतात. यासोबतच बरेच कर्मचारी हे प्रत्यक्ष कामावरच येत नसल्याच्याही तक्रारी वरिष्ठ अधिका-यांना मिळाल्या आहेत. या कर्मचा-यांच्या ऐवजी बदली कामगार लावून मुळ सेवकाच्या सह्या घेऊन कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केले जातात.

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छताविषयक कामे वाढविणे आणि या कामांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्याचे प्रयत्न अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सुरु केले आहेत. त्याअनुषंगाने डॉ. खेमनार हे आरोग्य कोठ्यांना पहाटे भेट देणार असून कामकाजाची पाहणी करणार आहेत. यासोबतच परिसरातील स्वच्छतेचा आढावा घेणे, नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे.

=====

1. स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे कर्मचारी घरोघर जाऊन वर्गीकृत कचरा गोळा करतात. या अनौपचारीक पद्धतीने काम करणा-या कचरा वेचकांना जेवणाकरिता स्वच्छ जागा, पाणी, हात धुण्याची आणि स्वच्छतागृहाची आवश्यक सोय ठेकेदारामार्फत करुन घेण्याच्या सूचना अतिरीक्त आयुक्तांनी दिल्या आहेत.

2. कागद,काच,पत्रा कष्टकरी पंचायत आणि स्वच्छ संस्थेच्या कचरा वेचकांच्या ग्रृप इन्शोरन्सकरिता बँक खाते उघडण्यासाठी शिखर बँकेला संपर्क करुन याकरिता शिबिरे आयोजित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Web Title: Additional Commissioner will inspect the health rooms in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.