येरवडा नागरीक कृती समिती व मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येरवडा परिसरातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या व्यसनविरोधी विचार जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटन श्रीखंडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी येरवडा पोलिस स्टेशनचे गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे, येरवडा नागरीक कृती समितीचे शैलेश राजगुरू, समीर शेख, रुपेश घोलप, अजय जानराव, नासिर पटेल, मंगेश भोसले, अक्षय शेलार यांच्यासह विविध संस्था, संघटना मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
येरवडा परिसरातील वाढती गुन्हेगारी याचे मुख्य कारण म्हणजे व्यसनाच्या आहारी मोठ्याप्रमाणावर आहारी गेलेली तरुण पिढी आहे. दारू, गांजा तसेच इतर अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुण, बालगुन्हेगार आदींवर चर्चा झाली व तो रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या गेल्या. येरवडा नागरीक कृती समितीच्यावतीने गुरुवारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी व्यसन विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
येरवडा परिसरातील विविध संस्था-संघटना मंडळ व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम स्थानिक वस्ती पातळीपर्यंत घराघरात राबवण्यात येणार असल्याचे यावेळी संयोजक शैलेश राजगुरू यांनी सांगितले.
--
०४येरवाडा व्यवसनमुक्ती
फोटो ओळ - येरवडा नागरीक कृती समितीच्या वतीने व्यसन विरोधी जनजागृती अभियान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुक्तांगणचे समुपदेशक दत्ता श्रीखंडे