शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:53 IST

खेड उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

राजगुरुनगर : राजगुरुनगरला विनापरवाना वाहन चालविणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई केली. येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर जवळपास ५६ जणांवर कारवाई करत १६ हजार ४०० रूपये दंड वसूल करण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले.

खेड उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाºया प्रवासी गाडीचालकाला १,००० रुपये दंड, तर अल्पवयीन मुलांच्या ताब्यात दुचाकी दिल्याबद्दल ९ पालकांवर न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, संतोष लांडे, विक्रम गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे व नीलेश बडाख हे अधिकारी सहभागी झाले होते. वाहतूक पोलीस हवालदार सर्जेराव बागल यांच्यासह होमगार्ड व महिला पोलीस कर्मचारीदेखील सहभागी झाले होते. विनाहेल्मेट वाहन चालविणे, ट्रिपलसीट वाहन चालविणे, विनाकागदपत्र वाहन चालविणे, वाहन चालवताना मोबाईल वापरणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, लेन कटिंग करणे व फॅन्सी नंबरप्लेट वापरणे आदी कारणास्तव प्रत्येकी ५०० ते २०० रुपये दंड आकारण्यात आला. यापुढे विनापरवाना वाहन चालविणार नाही, अशी शपथ विद्यार्थी व पालकांना देण्यात आली. विद्यार्थी व पालकांच्या गर्दीने पोलीस ठाण्याचे आवार फुलून गेले होते. त्यामुळे बघ्यांची गर्दी वाढली होती.वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरात सर्वत्र नाकाबंदी केली जाईल. अल्पवयीन मुलांच्या ताब्यात दुचाकी देऊ नये. रोडरोमिओ व गावगुंडांना या कारवाईने धडकी भरली आहे. यापुढेही कारवाईचे सत्र नियमितपणे सुरू राहील. सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे.- संदीप येळे,सहायक पोलीस निरीक्षक, खेड पोलीस ठाणे

टॅग्स :Puneपुणे