मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस नाईक तुकाराम मोरे यांनी फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंभाते व पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या सूचनेनुसार आंबेगाव तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचा आदेश मंचर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना दिले आहेत. तालुक्यात अवैध दारू विक्री व वाळू उपसा यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई होत आहे. मंचर येथे पुणे नाशिक महामार्गावर जीवन खिंड येथे मयुरेश कैलास येवले (रा.खरपुडी ता.खेड) शुभम बाजीराव शिंदे (रा.पेठ ता.आंबेगाव) यांनी आपल्या ताब्यातील ट्रकमध्ये चार ब्रास वाळू अंदाजे २८ हजार रुपये किमतीची कोणत्याही प्रकारची रॉयल्टी न भरता अनधिकृतपणे चोरी करून गौण खनिज वाहतूक केली. वाहतुकीचा कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना वाहतूक करत असताना निदर्शनास आल्याने त्यांची चौकशी करून वाळू व ट्रक मंचर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र हीले करत आहे.
विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:15 IST