शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

टमरेलबहाद्दरांवर कारवाई, २०० कुटुंबांना स्वच्छतागृहासाठी दिले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 23:31 IST

नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली

चाकण : शहरात नगर परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व्यक्तींवर पहाटे कारवाई करीत टमरेलबहाद्दरांचे डबे जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत १०० लोकांवर कारवाई करण्यात आली असून १२ लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे गेल्या १५ दिवसांपासून ही कारवाई करण्यात येत आहे.चाकण शहरातील बहुतेक नागरिकांकडे घरे आहेत, मात्र स्वच्छतागृहे नाहीत, अशा उघड्यावर शौचास जाणा-या २०० कुटुंबांना स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. यातील ४३ कुटुंबांची स्वच्छतागृहे बांधून झाली आहेत. उर्वरित १२३ कुटुंबांचे स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणा-या व उघड्यावर शौचास जाणा-या व्यक्तीकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हीच व्यक्ती दुस-यांदा सापडल्यास १००० रुपये दंड आकारला जाईल. तसेच तिस-या वेळी सापडल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, असे नगर परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्वच्छता अभियानांतर्गत नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्षा मंगल गोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती धीरज मुटके, गटनेते किशोर शेवकरी, विरोधी पक्षनेते जीवन सोनवणे, तसेच सर्व नगरसेवक व नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सार्वजनिक स्थळे, मंदिरे, शाळा, रस्ते, मैदाने आदी ठिकाणी ही मोहीम हाती घेतली आहे.>भाडेकरूंना सुविधा द्याचाकण शहरात अनेक भाडेकरू खोल्या आहेत. अशा ठिकाणी घरमालकांनी भाडेकरूंना स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याने हे भाडेकरू उघड्यावर शौचास जात आहेत. शहरातील कुठेही सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोय नसल्याने बाहेरगावांमधून बाजार समितीत किंवा भाजीपाला बाजारात माल खरेदी-विक्री करणा-या लोकांना नाईलाजास्तव उघड्यावर जावे लागत आहे. मग नागरिक दंडात्मक कारवाईच्या कात्रीत सापडत आहेत.नगर परिषदेकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालय किंवा मुतारीची सुविधा नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोयी-सुविधा उपलब्ध करून न देताच फक्त कारवाईचा दणका देऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.१२ जणांना दंडचाकण परिसरात गेल्या १५ दिवसांपासून नगरपरिषदेतर्फे कारवाई करण्यात येत आहेत. आतापर्यंत १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. यातील कारवाईत दुसºयांना सापडलेल्या १२ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. प्रत्येकी ५०० असा ६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार आहेत. नागरिकांनी स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्याचे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.