शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हरिप्रियाचे चार मजली मंगल कार्यालयावर जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 01:24 IST

पोलिसांची कारवाई : एनजीटीच्या आदेशाची पूर्तता न करणाऱ्या दातार फर्मला दणका

पुणे : राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचा (एनजीटी) आदेशाचे पालन न करणाºया दातार फर्मच्या सिंहगड रस्त्यावर असलेल्या हरिप्रिया मंगल कार्यालयावर पोलीस आयुक्तालयाकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. नदीपात्रात करण्यात आलेले अतिक्रमण तीन महिन्यांत काढा, असे आदेश एनजीटीने दिले होते.

न्यायाधीकरणाने दिलेला कालावधी संपल्याने जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी सांगितले.

पर्यावरण कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या समोर नदीपात्रातील अतिक्रमणाबाबत अ‍ॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. दातार फर्मस यांनी मुठा नदीपात्रात अनधिकृत भराव केलेला आहे. नदीपात्रात निळ्या पूररेषेच्या भर टाकण्यात आला होता. हा भर अनधिकृतपणे टाकण्यात आला असून संबंधितांना वेळोवेळी हा राडारोडा काढून टाकण्यासाठी नोटिसा बजाविण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले होते.

तसेच अतिक्रमण केलेला राडारोडा काढणे हे प्रतिवादी अंजली दातार आणि इतरांचे कर्तव्य असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार २०१३ साली दाखल झालेल्या याचिकेवर १६ मार्च २०१६ रोजी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.

आदेशाची पूर्तता न झाल्याने २०१७ मध्ये तक्रारदारांनी पुन्हा एनजीटीकडे धाव घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.अनेक विभागांकडे दिली जबाबदारीजलसंपदा विभागाकडे नदीपात्राच्या देखरेखीची जबादारी असून दातार फर्मने जर आदेशाची पूर्तता केली नाही तर जलसंपदा विभागाने झालेले अतिक्रमण खर्चाची रक्कम दातार फर्मकडून वसूल करावी. कारवाईवर महापालिकेनी निरीक्षण ठेवावी. तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखरेख ठेवावी, असे आदेश २७ आॅगस्ट रोजी दिले होते.तीन महिन्यांच्या आत अतिक्रमण न काढल्यास पुणे पोलीस आयुक्तांनी मंगल कार्यालयावर जप्ती आणण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी २७ नोव्हेंबरला आदेशाला तीन महिने पूर्ण झाले.दरम्यानच्या काळात एनजीटीच्या आदेशाचे पालन न झाल्याने हरिप्रिया मंगल कार्यालय सील करण्यात आले. डीपी रस्त्यावर असलेल्या अनेक मंगल कार्यालयाने केलेल्या अतिक्रमणावरदेखील यापूर्वी कारवाई करण्यात आली होती.