राहू : राहू विविध कार्यकारी सोसायटीच्या पदाधिकारी आर्थिक अपहार व गैरव्यवहार प्रकरणी सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारल्याने गुन्हे दाखल होणार आहेत. या बातमीने सोसायटीच्या सचिवासह पदाधिकाऱ्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कायदेतज्ज्ञांकडे धाव घेतली आहे. या कारवाईमधून बचावासाठी बड्या पुढाऱ्यांपुढे लोटांगण घातले आहे.राहू सोसायटीतील भ्रष्टाचाराबाबत लोकमतने सातत्याने आवाज उठविला होता. या वृत्ताची दखल घेऊन सहकार खात्याने या प्रकरणाची सखोल चौकशी केली होती. ७ वर्षांपासून या संस्थेची दप्तरतपासणी सुरू होती. या तपासणीत १ कोटी २३ लाख रुपयांचा अपहार व ७३ लाखांचा गैरव्यवहार (खत उधारी) झाल्याचे उघड झाले आहे. सन १९९७ ते २००८ या १३ वर्षांच्या कालावधीत संस्थेच्या अध्यक्षासह २८ संचालक, संस्थेचे सचिव व कर्मचाऱ्यांनी हा गैरव्यवहार व अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याची माहिती चंद्रकांत दळवी यांनी काल दिली होती. राहू विविध कार्यकारी सोसायटी ही दौंडचे विद्यमान आमदार तथा भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्या गावातील संस्था असल्याने या संस्थेवर त्यांचे राजकीय वाटचालीपासून वर्चस्व आहे. भीमा-पाटस कारखाना चालू हंगामात बंद राहतो ना राहतो, तोच त्यांच्याच गावच्या सोसायटीचा घोटाळा बाहेर पडत असल्याने व अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर सहकार खात्याने बडगा उगारला आहे.
राहू सोसायटी गैरव्यवहारप्रकरणी कारवाई
By admin | Updated: November 16, 2016 02:54 IST