शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसवर कारवाई सुरू, आठ जणांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 07:09 IST

खासगी बसचे भाडेदर नियंत्रित करण्याच्या शासन निर्णयानंतर प्रवाशांच्या याबाबतच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. मागील पंधरा दिवसंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींनुसार आठ

पुणे : खासगी बसचे भाडेदर नियंत्रित करण्याच्या शासन निर्णयानंतर प्रवाशांच्या याबाबतच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. मागील पंधरा दिवसंत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आलेल्या तक्रारींनुसार आठ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांकडून येणाऱ्या काही तक्रारींमध्ये अर्धवट माहिती असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने बाहेरगावी जाण्यासाठी नागरिकांकडून एसटीसह खासगी बसचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या बसला होणारी गर्दी मोठी असल्याने खासगी प्रवासी वाहतुक करणाºयांकडून अनेकदा त्याचा गैरफायदा घेतला जात होता. पूर्वी या बसच्या भाडेदरावर कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे भरमसाट भाडेवाढ करून प्रवाशांची लूट होत होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी खासगी बसचे कमाल भाडे निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार खासगी बससाठी प्रति किलोमीटर भाडेदर त्याच स्वरूपाच्या एसटी बससाठी येणाºया प्रति किलोमीटर भाडेदराच्या ५० टक्केपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर निश्चित करण्यात आले.या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य परिवहन प्राधिकरण आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरणावर (आरटीए) सोपविण्यात आली आहे.आरटीएचे सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी असल्याने या विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. पुणे विभागाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासन निर्णयानुसार आता खासगी बसचे भाडे नियंत्रित करण्यात आले आहे. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणाºयांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत.प्रवाशांकडून काही तक्रारी असून, त्यानुसार आठ जणांना नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आल्यानंतर खटले दाखल केले जातील. निश्चित करण्यात आलेले कमाल दर परवडणारे असल्याने वाहतूकदारांकडून त्याचे उल्लंघन केले जात नाही.वातानुकूलित, शयनयान बसच्या भाडेदराबाबत अद्याप संभ्रम आहे. त्यामुळे आरटीओने वाहतूकदारांची बैठक घेऊन त्याबाबत माहिती द्यायला हवी. भाडेदर, कारवाईचे स्वरूप याबाबत स्पष्टता नाही. खासगी बस थांबतात, त्याठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी तक्रारीबाबत माहिती प्रदर्शित करायला हवी, असे महाराष्ट्र राज्य मालवाहतूक व प्रवासीवाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.