शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बदलीसाठी दबाव टाकल्यास कारवाई; पुणे महापालिका प्रशासनाचा निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 11:57 IST

महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्‍याने बदलीसाठी दबाव टाकल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत. 

ठळक मुद्देमुख्य सभेच्या ठरावानुसार होणार शिस्तभंगाची कारवाई महापालिकेच्या मुख्य सभेने २००४ मध्ये याबाबत केला होता एक ठराव

पुणे : महापालिकेमध्ये बांधकाम, पाणीपुरवठा, पथ आदी विभागांमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी तसेच कर्मचार्‍यांची बदली केल्यास त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकार्‍यांवर राजकीय दबाव आणला जातो. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने नामी शक्कल लढविली आहे. यापुढे महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचार्‍याने बदलीसाठी दबाव टाकल्यास त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आले आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेने २००४ मध्ये याबाबत एक ठराव केला होता. कोणत्याही अधिकारी व कर्मचार्‍याने बदलीसाठी राजकीय दबावतंत्र वापरल्यास त्याच्यावर कारवाई करावी, असे ठरावामध्ये नमूद करण्यात आले होते. या ठरावाचा तब्बल १३ वर्षांनंतर आधार घेऊन त्याचे आदेश काढण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या बदली आदेशामध्ये याबाबतचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागातील निरीक्षकांच्या बदल्या केल्या होत्या. माननीयांनी त्याला आक्षेप घेऊन अतिरिक्त आयुक्तांना टार्गेट केले होते. जीएसटी लागू झाल्याने कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करू नयेत, असा ठराव काही दिवसांपूर्वी स्थायी समितीने मंजूर केला होता. मात्र प्रशासनाने या ठरावाची पर्वा न करता त्याच दिवशी कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामुळे राजकीय पदाधिकारी आणि प्रशासनात चांगलेच खटके उडू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोणी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याला थेट कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी दिली. आयुक्त कुणाल कुमार व राजकीय पदाधिकाºयांमध्ये बदल्यांवरून होत असलेल्या वादामध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांना मध्यस्थी केली होती. तरीही राजकीय पदाधिकारी व  प्रशासनातील कलगीतुरा थांबताना दिसत नाही. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका