शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई

By admin | Updated: February 1, 2016 00:45 IST

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत महसूल विभागाने वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.

इंदापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बाभूळगावच्या हद्दीत शनिवारी (दि. ३०) रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंत महसूल विभागाने वाळूचोरी करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. सात वाहनातील २० ब्रास वाळू जप्त केली. वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिब्रास ५१ हजार ७०० रुपयांप्रमाणे १० लाख ३४ हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली. तहसीलदार सूर्यकांत येवले, पोलीस निरीक्षक मधुकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी संतोष अनगरे, अविनाश डोईफोडे, एस. बी. माने, अजित पाटील, शिवाजी बिराजदार, तलाठी राजू तागवाले, तलाठी निलंजन वानखेडे, रवींद्र पारधी, शिवाजी खोसे, भिसे, विनायक कुलकर्णी, ईश्वर कोळी, राजाभाऊ पिसाळ, मनीषा वडेपल्ली, फौजदार संजय नीलपत्रेवार, पोलीस हवालदार सुभाषचंद्र दळवी, सचिन बोराटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. (वार्ताहर)शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारवाई सुरू केली. वाहने ताब्यात घेतली. वाहनाचे चालक पळून गेले. वाहने पुन्हा सुरू होऊ नयेत यासाठी ‘इंजिन लॉक’ केली. जेसीबीच्या साहाय्याने दोन वाहने इंदापूर पोलीस ठाण्यात पाठविली. उर्वरित पाच वाहनांच्या टायरमधील हवा सोडून दिली. वाहनांमधील वाळू रस्त्यावर खाली केली. वाहनांमधील खाली केलेली वाळू पंचनामे करून पोलीस पाटील अनिल भांगे यांच्या ताब्यात दिली आहे.- सूर्यकांत येवले, तहसीलदार