शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पाबळ दरोड्यातील चारही आरोपींवर मोक्काची कारवाई

By admin | Updated: February 28, 2016 03:41 IST

पाबळ येथे १७ डिसेंबर २0१५ रोजी झालेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या चारही आरोपींवर आता

शिक्रापूर : पाबळ येथे १७ डिसेंबर २0१५ रोजी झालेल्या सशस्त्र दरोड्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. या चारही आरोपींवर आता मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती दौंडचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे दिली.चंग्या ऊर्फ संदेश रामलाल ऊर्फ रमेश काळे (वय २३, रा.कोळगाव, ता. श्रीगोंदा) व शरद ऊर्फ शेऱ्या आप्पासाहेब काळे (वय २१, रा.रांजणगाव मस्जीद,ता. पारनेर), प्रवीण ऊर्फ फल्या आकार्शा काळे (वय २५) व श्रीक्रुष्ण ऊर्फ लंगड्या आकार्शा काळे (वय २0, दोघेही राहणार रा.रांजणगाव मशीद, घाडगेवाडी,ता. पारनेर,जि. नगर) अशी आरोपींची नावे आहेत. उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी सांगितले, की यातील मुख्य आरोपी चंग्या ऊर्फ संदेश काळे याच्यावर पंधरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यात दोन गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाली आहे. खून, दरोडे असे गंभीर गुन्हे आरोपींवर आहेत. अहमदनगर, बेलवंडी, सुपा, शिक्रापूर, कोतवाली एमआयडीसी आदी परिसरात आरोपींनी गंभीर गुन्हे केले आहते. या गंभीर गुन्ह्यांमुळे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यास परवानगी दिली.१७ डिसेंबर २0१५ रोजी पहाटे पाबळ येथील फुटाणवाडी व फणसे मळा या दोन ठिकाणी आरोपींनी बगाटे व पिंगळे कुटुंबांवर सशस्त्र दरोडा टाकला होता. त्यांनी केलेल्या मारहाणीत रखमाबाई बगाटे व दिनेश पिंगळे या दोघांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता.