शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रुबी हॉस्पिटलची वैशालीवर उपचार करण्यास टाळाटाळ, यादव कुटुंबाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:31 IST

रुबी हॉस्पिटलच्या वतीने एक वर्षापूर्वीच सहा वर्षांच्या वैशाली यादवच्या हृदयरोगावर मोफत उपचार करण्याचे व उच्च शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे जाहीर घोषणा केली.

पुणे : रुबी हॉस्पिटलच्या वतीने एक वर्षापूर्वीच सहा वर्षांच्या वैशाली यादवच्या हृदयरोगावर मोफत उपचार करण्याचे व उच्च शिक्षणापर्यंतची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे जाहीर घोषणा केली. परंतु यादव कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनाचा रुबी हॉस्पिटलला एक वर्षातच विसर पडला आहे. पुढील उपचारासाठी रुबी हॉस्पिटलकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप तिचे वडील मोहनीश यादव आणि काका प्रताप यादव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.आर्थिक परिस्थिती हलाखीची. वैशालीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पत्राद्वारे संवाद साधला होता. पंतप्रधानांच्या पुढाकाराने पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये २०१६ मध्ये वैशालीवर हृदयाची शस्त्रक्रिया पार पडली. हॉस्पिटलचे प्रमुख विश्वस्त डॉ. परवेझ ग्रॅँट यांनी व वैशालीच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदी पुण्यात आले असता, तिच्या उच्च शिक्षणापर्यंत तसेच पुढील सर्व उपचाराचा खर्चही रुग्णालयातर्फे करण्यात येईल, असे सांगितले होते, असे वैशालीचे काका प्रताप यादव यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी वैशालीच्या छातीमध्ये वेदना होऊ लागल्याने १२ आॅक्टोबर रोजी तपासणी करण्यासाठी हॉस्पिटल येथे घेऊन गेले. दुसºया दिवशी वैशालीवर शस्त्रक्रिया करणाºया डॉ. श्रीनिवास किणी यांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी जात असताना त्यांना ८०० रुपये भरण्यासाठी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार डॉ. किणी यांनी वैशालीवर शस्त्रक्रिया केली असून, हॉस्पिटलमध्ये लावलेला फोटो वैशालीचाच असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला सांगितले. डॉ. किणी यांना कर्मचाºयाने संबंधित माहिती दिली, मात्र पैसे दिल्याखेरीज त्यांना आतमध्ये सोडू नये, अशा सूचना त्या वेळी दिल्या. वैशालीवर सर्व उपचार मोफत करण्याचे मान्य केले असतानाही, हॉस्पिटलतर्फे पैसे मागण्यात आले. तसेच शाळेमध्ये दाखल होण्यासाठी लागणाºया तीन हजार रुपयांचे कोटेशन घेऊन सात ते आठ वेळा गेले असता, ते मंजूर करण्यासाठी टाळाटाळ केली, असे मोहनीश यादव यांनी सांगितले.यादव कुटुंब योग्यव्यक्तींना भेटले नाहीत१रुबी हॉस्पिटल आजही वैशाली यादववर मोफत उपचार करण्यास तयार असून, आपल्या शब्दावर ठाम आहे. तसेच शैक्षणिक खर्च करण्यासदेखील तयार आहे. १२ आॅक्टोबर रोजी तपासणी करण्यासाठी वैशालीला तिच्या काका आणि वडिलांनी रुबी हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा योग्य व्यक्तींना भेटले नाही.२त्यांनी थेट डॉ. परवेझ ग्रँट अथवा हॉस्पिटलच्या सामाजिक अधिकाºयांना भेटणे अपेक्षित होते. परंतु परस्पर डॉ. श्रीनिवास किणी यांच्या ओपीडीमध्ये तपासणीसाठी गेल्याने त्यांना पैसे भरण्यास सांगितले.३यामध्ये हॉस्पिटलची काही चूक नसल्याचा खुलासा रुबी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर