पुणे : बलात्काराच्या गुन्ह्यात गेल्या ४ वर्षांपासून येरवडा कारागृहात असणारा आणि मानसिक उपचार सुरू असताना रविवारी सकाळी ससून रुग्णालयातून आरोपीने पलायन केले़. अक्षय अशोक लोणारे (वय २१) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी मुख्यालयातील पोलीस नाईक एस़. एम़.निकम यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. कोंढवा पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्याला २०१५ मध्ये अटक केली होती़. त्यानंतर तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता़. त्याच्यावर मानसिक उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयातील मनोरुग्ण वॉर्ड क्रमांक २६ मध्ये त्याला दाखल करण्यात आले होते़. त्याच्यावर निगराणी ठेवण्यासाठी पोलीस मुख्यालयातील पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती़. रविवारी सकाळी साडेआठ वाजता त्याने हातातील बेडी काढून तो गार्डवरील पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळून गेला़. पोलीस उपनिरीक्षक तुषार पाचपुते अधिक तपास करीत आहेत़.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी ससूनमधून पळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 13:38 IST
मानसिक उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयातील मनोरुग्ण वॉर्ड क्रमांक २६ मध्ये आरोपीला दाखल करण्यात आले होते़.
बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी ससूनमधून पळाला
ठळक मुद्देकोंढवा पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्याला २०१५ मध्ये अटक