सचिन तानाजी वाघमारे, वय २२ वर्षे, राहणार आंबेगाव पठार, सोमनाथ दत्तात्रय गाडे, वय २५ वर्षे, राहणार आंबेगाव पठार, तुषार जालिंदर सरोदे, वय २५ वर्षे, राहणार, कात्रज अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांनी संग्राम गुलाब लेकावळे याचा बुधवारी रात्री गणराज चौकाजवळ कुऱ्हाड, तलवार आणी काठ्यांनी वार करून खून केला होता.
या गुन्हयाचा तपास सुरू असताना तपास पथकातील अंमलदार शिवदत्त गायकवाड व प्रणव संकपाळ यांना अल्पवयीन असलेले चार आरोपी पुणे रेल्वे स्थानकावरून बाहेरगावी पळून जाणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलीस पथकाने पुणे रेल्वे स्टेशन परिसर पिंजून काढला असता, त्यांना चौघे आरोपी दिसले. त्यांनी आरोपींच्या दिशेने धाव घेताच ते पळून जाऊ लागले. मात्र त्यांना पाठलाग करून थोड्याच अंतरावर पकडण्यात आले.
त्यांना त्याब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सचिन, सोमनाथ व तुषार यांच्या मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानुसार या तिघांनाही अटक करण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, प्रकाश पासलकर, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सचिन धामणे, उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, श्रीधर पाटील, संतोष भापकर, गणेश सुतार, प्रणव संकपाळ, सर्फराज देशमुख, सचिन पवार, आकाश फासगे, नीलेश खोमणे, समीर बागशिरास, विजय कुंभारकर, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडकर, हर्षल शिंदे, राहुल तांबे, अभिजित जाधव, विक्रम सावंत, संतोष खताळ, प्रकाश टापरे व रवींद्र बोरुडे यांच्या पथकाने केली.