शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तुलासह आरोपी गजाआड

By admin | Updated: January 28, 2017 01:52 IST

पूर्ववैमनस्यातून एकाला ठार मारण्यासाठी आणलेल्या पिस्तुलासह गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली आहे.

पुणे : पूर्ववैमनस्यातून एकाला ठार मारण्यासाठी आणलेल्या पिस्तुलासह गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली. उमेश बाळासाहेब काळभोर (वय ३५, रा. धायरीगाव ) असे युनिट एकने पिस्तुलासह अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रामबाग परिसरात एक जण पिस्तुलासह येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील व सहायक फौजदार संभाजी भोईटे यांना मिळाली होती. त्यांनी सहायक निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, सहायक फौजदार शशिकांत शिंदे, रवींद्र कदम, संभाजी भोईटे, पोलीस हवालदार रिजवान जिनेडी, प्रकाश लोखंडे, मेहबूब मोकाशी, उमेश काटे, श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, तुषार खडके, सुधाकर माने, सुभाष पिंगळे, अशोक माने, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले यांच्यासह सापळा लावला. काळभोर याला ताब्यात घेऊन अंगझडती घेण्यात आली. त्यांच्या कंबरेला एक गावठी पिस्तूल व चार काडतुसे मिळाली. त्याच्याविरोधात खून व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असून तो नुकताच येरवडा कारागृहात शिक्षा भोगून बाहेर आला आहे. काळभोर हा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा सक्रिय झाल्याचेही पोलिसांना समजले होते. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.