पुणे : सदनिका फोडून ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून १ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. बैतुसिंग श्यामसिंग कल्याणी (वय २२, रा. रामटेकडी, हडपसर), सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय २७, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी वैशाली उत्तरेश्वर चव्हाण (रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. ही कारवाई उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक एम. एम. मुजावर यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)
घरफोडीतील आरोपींना गुन्हे शाखेने केली अटक
By admin | Updated: January 23, 2017 03:16 IST