शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली युवतीवर सतत दहा वर्षांपासून बलात्कार करणारा आरोपी बारामतीहून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:12 IST

लग्नाचे आमिष दाखवून बंगाली युवतीवर सतत दहा वर्षांपासून बलात्कार करून फरार आरोपीला बारामतीहून अटक, अठरा मे पर्यंत पोलीस कोठडी

चाकण : लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दहा वर्षांपासून बंगाली युवती सोबत एकाच खोलीत एकत्र राहून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून लग्न न करता फसवणूक करून शिवीगाळ व दमदाटी करून पीडित महिलेस एकटी सोडून फरार झालेल्या आरोपीला चाकण पोलिसांनी बारामतीहून अटक केली असून न्यायालयाने आरोपीला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात अली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुरुवार दि. १ मार्च २०१८ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली. सन २००७ ते दि. ४ डिसेंबर २०१७ या कालावधीत हा प्रकार महाळुंगे इंगळे ( ता.खेड ) येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपी अमोल सिद्दप्पा परिट ( वय ३२, रा. महाळुंगे इंगळे, मूळ रा. निंबर्गी, ता.दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर ) हा १ मार्चला गुन्हा दाखल झाल्यापासून मुळगावाहूनही फरार झाला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक श्रीधर जगताप व पोलीस नाईक वीरसेन गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला बारामतीहून ताब्यात घेतले व अटक केली. याबाबतची अधिक माहिती अशी कि, सन २००६ मध्ये आरोपी अमोल परीट व फिर्यादी महिलेची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर सन २००७ मध्ये आरोपीने पीडित युवतीस ‘आपण दोघे लग्न करून चाकण येथे कंपनीत काम करून एकत्र राहू’ असे म्हणून लग्न करण्याचे अमिष दाखवून महाळुंगे येथे खोली भाड्याने घेऊन एकत्र राहू लागले. सदर कालावधीत आरोपीने पीडित युवतीवर शरीर संबंध ठेवले व पीडितेस लग्न करतो, असे सांगून युवतीची फसवणूक केली. दहा वर्षे एकत्र राहूनही पीडितेने त्यास लग्नाबाबत विचारल्यावर आरोपीने पीडितेस वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी केली. व दि. ४ डिसेंबर २०१७ रोजी पीडितेस सोडून त्याचे मूळगावी निघून गेला. पीडितेने वेळोवेळी फोन केले असता त्याने मोबाईल बंद करून ठेवला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २०८/२०१८ भादंवि कलम ३७६, ४१६, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीधर जगताप हे पुढील तपास करीत आहेत.