शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

आरोप-प्रत्यारोप करत अंदाजपत्रक मंजूर, विरोधक व सत्ताधारी सदस्यांच्या शेरोशायरीमुळे चर्चा रंगतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 04:02 IST

महापालिकेचे सन २०१८-१९ चे ५ हजार ८७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दोन दिवसांच्या चर्चेत आरोप-प्रत्यारोप करत अखेर मंगळवारी विशेष सभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांकडून पुणेकरांची फसवणूक करणारे, मृगजळ, भ्रम निर्माण करणारे, वर्गीकरणाला वाव देणारे व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेले बजेट असल्याचा आरोप केला.

पुणे  - महापालिकेचे सन २०१८-१९ चे ५ हजार ८७० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक दोन दिवसांच्या चर्चेत आरोप-प्रत्यारोप करत अखेर मंगळवारी विशेष सभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांकडून पुणेकरांची फसवणूक करणारे, मृगजळ, भ्रम निर्माण करणारे, वर्गीकरणाला वाव देणारे व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेले बजेट असल्याचा आरोप केला. तर सत्ताधारी सदस्यांनी भाजपाने एका वर्षातच शहराच्या विकासासाठी अनेक चांगल्या योजना मार्गी लावल्या असून, विरोधक चुकीचे आरोप करून पुणेकरांचीच दिशाभूल करत असल्याचे सांगितले. महापालिकेच्या सन २०१८-१९ च्या अंदाजपत्रकावर गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या विशेष सभेत चर्चा सुरू होती. यासभेत सुमारे ७५ सदस्यांनी सहभाग घेत भाषणे केली. स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या भाषणात विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत वस्तूस्थिती समोर ठेवली. यात गेले वर्षभर काम करताना जबाबदारी म्हणून पाहिलं. सर्वांना सोबत घेऊन काम केलं. मागील वर्षी ज्या योजना मांडल्या त्या पूर्ण केल्या, त्या मंजूर झाल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. कागदावर योजना मांडली आणि ती लागू झाली असे होत नाही. कुंडलिका नदीची योजना पूर्ण झाली नाही ते अंदाजपत्रक मांडताना मान्य केले. अंदाजपत्रक हा अंदाज असतो. आपल्या काळात २०१६-१७ या शेवटच्या अंदाजपत्रात २ हजार कोटींची तूट होती. पण कधीतरी आपण वास्तव स्वीकारणार नाही का, हे ठरवूनच अंदाजपत्रक मी मांडले. ठरवून मी नवीन योजना आणली नाही. आपण ६० ते ७० योजना राबवत आहोत. मग अधिकच्या योजना न आणता अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला. गेले २५ वर्षे सत्तेत असलेले नगरसेवक एका वर्षात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतात, त्यांनी भान ठेवून बोलावे असेही सांगितले.विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी बजेटमध्ये नवीन काहीच नाही, ७० टक्के जुनेच बजेट सादर केले आहे. काहीच नसल्याने पारदर्शक व खरे वास्तववादी बजेट म्हणावे लागेल सांगत उपरोधिक टोला लावला. सिमेंटचे रस्ते करण्यास आयुक्तांनी बंदी घातली. यामुळे यावर्षीचे बजेट सुरुवातीपासून वर्गीकरणाचे बजेट ठरणार आहे. राज्य सरकार पुणेकरांसोबत सावत्र असल्यासारखे का वागते, हे कळत नाही. प्रशासनाकडून स्थायी समितीची फसवणूक करत आहे. सेवक वर्गाच्या खर्चासाठी प्रशासनाकडून बजेट फुगवले जात आहे. प्रशासनाकडून उत्पन्नवाढीबाबत काहीच सांगितले नाही, ही खेदाची बाब आहे. ‘ख्याब वो ना दिखाना, जो पुरे ना कर सके, वादे ऐसे ना करो, जो निभा ना सके’ सांगत सत्ताधाºयांना टोले लावले.तर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यापूर्वीच्या अनेक अंदाजपत्रकांचे दाखले देत भाजपाच्या अंदाजपत्रक कसे फसवे असल्याचे दाखवून दिले. महापालिकेचे सन २०१८-१९ अंदाजपत्रक गत वर्षीपेक्षा ४२ कोटीने कमी करून सत्ताधारी भाजपाने पुणेकरांची पहिल्याच अंदाजपत्रकात फसवणूक केल्याची लेखी कबुली दिली. राज्यसरकारकडून जीएसटी अनुदान देताना दुजाभाव केला जात असून, तुटीचे बजेट सादर करता शासनाला जाब कोण विचारणार, असा सवाल उपस्थित केला. केबल डक्टमधून २०० कोटी उत्पन्न मिळणार असल्याचे सांगत आयुक्तांकडून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे. स्मार्ट सिटी योजना फसवी असल्याचे स्पष्ट अमृत योजनेअंतर्गत एकही रुपया आला नाही. कर्जरोखे उभे करताना आयुक्तांनी मृगजळ, भ्रम निर्माण केला. पण भविष्यात याबाबत पुणेकरांना तुम्हा-आम्हाला उत्तर द्यावे लागेल, हे लक्षात ठेवा. मेट्रोच श्रेय घ्यायचे असेल तर प्रकल्पाच्या विलंबामुळे ३ हजार ७०० कोटीने खर्च वाढला यांचे पापदेखील भाजपाने आपल्या माथी घ्यावे, असे त्यांनी सांगितले. शिवसेना गटनेते संजय भोसले यांनी अंदाजपत्रकात हजारो कोटी रुपयांची तुट निर्माण झाली असताना सह यादी तब्बल १०० कोटींची कशी करता, हा प्रश्नच असल्याचे सांगितले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन नदीसुधार, समान पाणी पुरवठा योजना, सायकल योजनांना बजेटमध्ये तरतूद केल्याचा आरोप केला. अनेक चांगल्या योजना, निराधारांच्या योजना बंद केल्या मग वास्तववादी बजेट कसे असा प्रश्न उपस्थित केला.स्थायी अध्यक्ष अर्धा तासच हजर1गेल्या दोन दिवसांपासून विशेष सभेत महापालिकेच्या २०१८-१९ च्या अंदाजपत्रकावर चर्चा सुरू आहे.परंतु, नियोजित स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक दुसºया दिवशी मंगळवारी केवळ अर्धा तास सभागृहात उपस्थिती लावून गेले.2विशेष असे की पुढील वर्षभर जे अंदाजपत्रक राबवायचे आहे, त्यावर भाजपासह सर्व नगरसेवक त्यांची मत, शंका, सूचना करत असताना ते जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नसल्याचे दिसून येते. त्यांच्या अनुपस्थितीवर सर्वच ज्येष्ठ नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.वैशाली बनकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने सुरू केलेली ‘स्वच्छ पुणे- सुंदर पुणे’ योजना केवळ नाव बदलून पुन्हा सुरू पण नाव बदलण्याची गरज काय, सांगत नाराजी व्यक्त केली. सिद्धार्थ शिरोळे यांनी बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास योजनेचे स्वागत केले. योगेश ससाणे यांनी ‘सबका साथ-सबका विकास’ सांगत सत्तेवर आलेल्या भाजपाकडून गेल्या दोन वर्षांत केवळ ‘अपने साथ-आपणोंका विकास’ सुरू आहे. तर धीरज घाटे यांनी विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचा आपल्या भाषणात चांगला समाचार घेतला.ज्योत्स्ना एकबोटे यांनी बालगंधर्व रंगमंदिराबाबत पुनर्विकास होऊन जागतिक दर्जाचे थिएटर उभे राहात आहे, याचा मनापासून आनंद आहे. एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याचा फोटो अंदाजपत्रकात न छापल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी अमोल बालवडकर, जयंत भावे, मनीषा लडकत, नंदा लोणकर, पल्लवी जावळे, सुजाता शेट्टी, मनीषा कदम, दत्तात्रय धनकवडे, स्मिता वस्ते, प्रशांत जगताप, बाळा ओसवाल, संगीता ढोसर, गोपाळ चित्तल यांनी अंदाजपत्रकावर भाषण केले.४मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी गतवर्षाच्या अंदाजपत्रकातील तुट व महसूली खर्च वजा केला तर शहराच्या विकासासाठी केवळ १,४६५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतोय; मग ५ हजार ८७० कोटी अंदाजपत्रकाला वास्तववादी कसे म्हणायचे, हा प्रश्नच आहे. आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्या अंदाजपत्रकातील आकडेवारी पाहिली तर खूप तफावत आहे. यामुळे भ्रम निर्माण करणारे अंदाजपत्रक आहे. राज्य शासनाकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आणण्यासाठी प्रयत्न न करता शहरातील आमदार-खासदार महापालिकेच्या अंदाजपत्रकावर डोळा ठेवतात, हे चुकीचे आहे.४विरोधकांकडून किती ही टीका होत असली तरी महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक खºया अर्थाने वास्तववादी असल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी शहरातील अनेक योजना पहिल्या वर्षात मार्गी लागल्या आहेत. वास्तववादी अंदाजपत्रक आहे. यावर्षी एकाही प्रकल्पचा निधी वर्गीकरण केले नाही. जीएसटीचे पैसे उद्या मिळणार आहेत. मागील वर्षीपेक्षा २९ कोटी रुपये अधिक मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांनी दिशाभूल करू नये, असे सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका