शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भाकणुकीच्या कार्यक्रमाने बाबीर यात्रेची सांगता, बाळाला झोका देऊन फेडला नवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:14 IST

परंपरेला फाटा : बाळाला झोका देऊन फेडला नवस

कळस : मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर देवाच्या यात्रेची शनिवारी (दि. १०) भाकणुकीच्या कार्यक्रमाने सांगता झाली; तसेच गेल्या दोन वर्षांपासून येथील अघोरी बगाड प्रथा बंद केली आहे, त्याऐवजी नवसाच्या बाळाला मंदिरासमोर झोका देऊन नवस फेडला गेला.

यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यांतून लाखो भाविकांनी यात्राकाळात देवदर्शनासाठी हजेरी लावली. यात्राकाळात सुमारे तीन लाखांहून अधिक भाविकांनी देवदर्शनासाठी हजेरी लावल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्षअजितसिंह पाटील व सरपंच रूपाली आकाश कांबळे यांनी दिली. दिवाळी पाडव्यादिवशी देवाचा घट हलविल्यानंतर यात्रेस सुरुवात झाली. या वेळी गावातून देवाच्या पालखीने मंदिराकडे प्रस्थान ठेवले. गुलालाची उधळण, तोफांची सलामी व ढोलच्या निनादात पालखी मंदिरस्थळी आली. यानंतर भाविकांनी देवदर्शनासाठी हजेरी लावण्यास सुरुवात केली. शुक्रवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. या वेळी देवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर नवस परतफेडीचा कार्यक्रम झाला. आज सकाळी बगाड व भाकणूक व पकाळणीचा कार्यक्रम झाला. महिलांनी यात्रेमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते. यात्रेसाठी आकाश कांबळे, यशवंत कचरे, शेखर पाटील, अंकुश लावंड, तानाजी मारकड, पांडुरंग डोंबाळे, रवि शिंदे, नानासो थोरात यांनी परिश्रम घेतले.तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, पोलीस निरीक्षक अरविंद काटे, ग्रामपंचायतींच्या सरपंच रूपाली आकाश कांबळे व देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यायामुळे ग्रामस्थांकडून प्रशासनाच्या नियोजनाचे कौतुक केले. 

टॅग्स :Puneपुणे