शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त सुखोई-३० विमान जैसे थे

By admin | Updated: October 16, 2014 06:00 IST

प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्त झालेले हवाईदलाचे सुखोई ३० हे विमान बुधवारी जैसे थे होते.

वाघोली : प्रशिक्षणादरम्यान अपघातग्रस्त झालेले हवाईदलाचे सुखोई ३० हे विमान बुधवारी जैसे थे होते. दिवसभर हवाईदलाच्या तुकडीने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने पंचनामा करण्याचे काम सुरू होते. अपघातग्रस्त विमान पाहण्यासाठी आजदेखील असंख्य नागरिक परिसरामध्ये गर्दी करीत होते.केसनंद गावाजवळील कोलवडी येथील साळुंकेमळा परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी ५.४५च्या सुमारास हवाईदलाचे सुखोई ३० हे विमान प्रशिक्षणादरम्यान कोसळले होते. उसाच्या शेतामध्ये पडलेल्या या विमानाच्या पुढच्या भागाला तडा जाऊन मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही वेळात ग्रामस्थांनी विमानाच्या मागच्या बाजूला माती व पाणी मारून आग आटोक्यात आणली होती. अपघाताची घटना घडताच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी विमान पाहण्यासाठी गर्दी केली होती. ग्रामीण पोलीस व हवाईदलाच्या तुकडीने गर्दी हटवून विमानाच्या भोवती कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी रात्रीपासून तळ ठोकून असणाऱ्या हवाईदलाच्या तुकडीने संबंधित विमान व परिसर सील केला आहे. परिसरामध्ये कोणालाही फिरकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बुधवारी दिवसभर हे अधिकारी पंचनामा करीत होते. अपघातग्रस्त विमान जैसे थेच असून, ते हलविण्यासंदर्भात कोणतेही पाउल हवाईदलाच्या वतीने बुधवारी सायंकाळपर्यंत उचलण्यात आले नव्हते. पोलीस व हवाईदलाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही या परिसरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात येत आहे. तरी, नागरिकांना अपघातग्रस्त विमान पाहण्याची उत्सुकता लागल्याने जागा मिळेल त्या दिशेने ते पाहण्यासाठी पुढे जात आहेत. मात्र, नागरिकांना परिसरातून हकलण्यासाठी पोलीस व हवाईदलाला चांगलीच कसरत करावी लागत असल्याचे चित्र बुधवारी पाहावयास मिळाले. (वार्ताहर)