शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मानवी चुकांमुळे अपघातांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 06:25 IST

भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून

पुणे : भरधाव वेगाने जाणे, रस्त्यावरील सूचनांकडे दुर्लक्ष करणे, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे अशा विविध कारणांनी महामार्गावरील अपघातांत दिवसेंदिवस वाढ होत असून,एकूण अपघातांपैकी ५७ टक्के प्राणघातक अपघातांमध्ये मानवी चुका हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे़ पुणे-मुंबई दरम्यानच्या द्रुतगती महामार्गावरील गतवर्षी झालेल्या १५५ अपघातांच्या केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे़पुणे-नाशिक रोडवर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टेम्पोलामागून बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यूझाला होता़ तसेच राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांत अनेक प्राणघातक अपघात झाले होते़ पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर गतवर्षी झालेल्या अपघातांपैकी ५४ अपघात हे सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान झाले आहेत़ त्याखालोखाल मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान ३१ अपघात झाले होते़ या १५५ अपघातांत २४० वाहने आणि १६ पादचाºयांचा समावेश होता़ त्यात सर्वाधिक ४१ टक्के मोटारी, ४० टक्के ट्रक यांचा समावेश होता़ पुणे जिल्ह्णात गेल्यां वर्षी ९६५ प्राणघातक अपघात झाले असून त्यात १०६१ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता़ मुंबई -पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या १५५ अपघातापैकी ९९ अपघातात ११८ जणांना प्राण गमवावे लागले तसेच ३०० जण गंभीर जखमी झाले होते़ या अपघातांचया अभ्यास जे पी़ रिसर्च इंडिया ने ट्रक केला़ त्यात अनेक निष्कर्ष समोर आले आहेत़या अपघातांमध्ये कार आणि ट्रक यांचा ८० टक्के सहभाग होता़ त्यातील ५४ टक्के कारमधील किमान एका जणाचा मृत्यू झाला होता़ आणि ७१ टक्के वाहनांमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़ २१ टक्के ट्रकमधील एका जणाला मृत्यूलासामोरे जावे लागले, तर १८ टक्के ट्रकमधील किमान एक जण गंभीर जखमी झाला होता़मानवी चुकांमुळे झालेल्या अपघातात अतिवेगामुळे सर्वाधिक अपघात झाल्याचे दिसून येते़ एक्स्प्रेस-वेवर वाहनचालक लेनची शिस्त पाळताना दिसत नाही़ चुकीच्या पद्धतीने लेन कटिंग केल्यामुळे अपघाताचे प्रमाणही अधिक आहे़ त्याचबरोबर वाहन चालवताना चालकाला डुलकी लागणे त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला धडकून झालेल्या अपघातांचे प्रमाणही जास्त आहे़ वाहनचालकाने सीटबेल्ट न बांधल्यामुळे ५७ टक्के अपघाताताचे गांभीर्य वाढल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे़ 

टॅग्स :Accidentअपघात