शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांमुळे वाढले अपघात

By admin | Updated: August 29, 2014 04:37 IST

गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे

हडपसर : गेल्या आठवड्याभरापासून सकाळी उकाडा आणि दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साठले आहे. रस्त्यावर खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे दुचाकीच्या अपघातांत वाढ झाली असून, वाहनांचा वेगही मंदावला आहे, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे सोलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने खड्डे बुजविण्याची अद्याप तसदी घेतली नाही. आकाशवाणी ते लक्ष्मी कॉलनीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर नागरिकांना पायी चालण्यासाठी रस्ता मिळत नाही, अशी अवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर रस्त्याचे काम रखडले असून, अद्याप त्याला गती आली नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी काही दिवस काम गतीने केले, त्यानंतर अर्धवट राहिलेले काम बंद पडले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिक नागरीक कमालीचे त्रस्त झाले आहेत.झोपडपट्टीमधील नागरिकांना मध्यरात्रीपासून लहानग्यांना घेऊन कॉटवर बसावे लागले. संसार पाण्यात गेल्याने झोपडपट्टीधारकांचे मोठे नुकसान झाले. शाळा-महाविद्यालयांच्या मैदानावर तसेच उद्यानामध्येही पाण्याचे तळे साठले होते. भाजी मंडईमध्ये पाणी साठल्याने भाजी विक्रेत्यांची मोठी अडचण झाली. रवीदर्शन समोर पाणी जाण्यासाठी पावसाळी गटारयोजना नसल्यामुळे दोन फूट पाणी साठले होते, वैदूवाडी चौक, रामटेकडीच्या पुलाच्या बाजूला, तसेच फातिमानगर चौकात मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. बैठ्या घरांमध्येही पाणी शिरले होते. जुन्या पद्धतीच्या घरांच्या छप्परातून पाणी गळत होते. (वार्ताहर)