लोणी देवकर : पुणे-सोलापूर महामार्गावर वरकुटेपाटी येथे गतिरोधकामुळे अचाकन ब्रेक दाबल्यामुळे बुधवारी (दि. २१) पहाटे ५ वाजता प्रवासी ट्रॅव्हल्सने (एमएच ०४-जीपी १६२५) पाठीमागून टँकरला ठोकरले, तर ट्रॅव्हल्सला ट्रकने (एमएच ०४-एएल ४४९५) पाठीमागून ठोकरले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.ट्रक व ट्रॅव्हल्सचे या वेळी मोठे नुकसान झाले. वरकुटेपाटी येथील वेग नियंत्रक हा मोठा व डबल असल्याने वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक आहे. या गतिरोधकामुळे या ठिकाणी या प्रकारे अपघात रोजच घडत असल्याने रस्ते बांधकाम विभागाने तत्काळ वरकुटेपाटीजवळील वेगनियंत्रक काढून टाकावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.(वार्ताहर)
अचानक ब्रेक दाबल्याने अपघात
By admin | Updated: December 23, 2016 00:03 IST