शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

दुसऱ्या यादीतील प्रवेश आजपासून

By admin | Updated: July 7, 2016 03:38 IST

पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक व अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ७ जुलै

पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक व अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अकरावीच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या ७ जुलै ते ९ जुलै या कालावधीत प्रवेश घेता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी ५0 रुपये भरून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहे, असे सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनी सांगितले. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीतून ५ हजार ४0 विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश देण्यात आले असून, १0 हजार ५२३ विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळाली आहे, असे नमूद करून राऊत म्हणाल्या, की येत्या ७ जुलै रोजी ‘ईद’ सण आहे. मात्र, तरीही महाविद्यालयांमध्ये सकाळी ११ ते ४ या वेळेत प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार आहे. ईद सणामुळे काही विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही तर या विद्यार्थ्यांनी ८ किंवा ९ जुलै रोजी सकाळी ११ ते ४ या वेळेत ५0 रुपये भरून प्रवेश निश्चित करावा. शनिवारी बहुतांश सर्व कनिष्ठ महाविद्यालये अर्धवेळ सुरू असतात. मात्र, विद्यार्थी हिताचा विचार करून शनिवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत सर्व महाविद्यालये सुरू राहणार आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे याबाबतचे परिपत्रक काढले जाणार आहे.दरम्यान, पहिल्या प्रवेश फेरीतून प्रवेश मिळूनही दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ५0 रुपये भरून प्रवेश निश्चित केला नव्हता. त्यामुळे हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर गेले आहेत. दुसऱ्या प्रवेश यादीतून या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन प्रकियेतून निश्चित होतात त्यांनी नियोजित वेळेमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)