लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराच्या हद्दी लगतची २३ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यासाठी या गावांच्या सुधारित हद्दी त्यांचा तपशील सर्वे क्रमांक पुणे शहराची सुधारित हद्द या सगळ्याचा अभिप्रायासह अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने जिल्हाधिकार्यांना दिल्या आहेत.
ग्रामीण क्षेत्रातील ३४ पैकी ११ गावांचा समावेश ४ नोव्हेंबर २०१७ रोजी महापालिकेत करण्यात आला. उर्वरित २३ गावांच्या समावेशासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर शासनाने टप्प्याटप्प्याने गावे महापालिकेत समाविष्ट केली जातील असे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाने हा अहवाल मागितला आहे. मंतरवाडीच्या समावेशाबद्दलही माहिती मागवली आहे.
चौकट
ही २३ गावे येणार महापालिकेत
म्हाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, अवताडे, हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकर वाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली.