खोडद : कधी कधी दोन्ही हात आणि पाय सुरक्षित असतात, तसेच शरीरदेखील धडधाकट असूनही ज्यांना काहीच जमत नाही, मात्र ज्यांच्याकडे काही तरी कमतरता आहे, अपंगत्व आहे, अशी माणसं मात्र इतरांना लाजवेल असे काम करतात. कार्तिकी एकादशीनिमित्त सायकलवरून वारी करणारे आणि तेही एका पायाने अपंग असलेले पिंपळवंडी येथील ५८ वर्षांचे बाबूराव मनाजी गावडे सध्या धडधाकटांसाठी एक प्रकारे आदर्श ठरत आहेत.गावडे यांचा १९८४ मध्ये अपघात होऊन या अपघातात त्यांना आपला उजवा पाय गमवावा लागला. या अपघातानंतर किंचितही खचून न जाता पांडुरंगाविषयी व माऊलींविषयी मनात असलेल्या ओढीमुळे ते आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र अशा सर्व एकादशीला सायकलवरून प्रवास करून देवाच्या भेटीला न चुकता जात आहेत. १९८५ पासून आतापर्यंत त्यांनी सायकलवरून प्रवास करून ७० वाऱ्या पूर्ण केल्या असून १०१ वाऱ्या पूर्ण करण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला आहे. पंढरपूरची वारी पिंपळवंडी ते पंढरपूर त्यांनी ७ दिवसांत सायकलवरून पूर्ण केली आहे.
अपंगाच्या सायकलवर ७० वाऱ्या
By admin | Updated: December 8, 2015 00:07 IST