शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीयांना मारहाण करणारे अद्याप फरार, अटक न केल्यास रिपाइंचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:16 IST

बारामती : बारामती एमआयडीसीतील बाळकृष्ण पेपर मिलमधील परप्रांतीय कामगारांना अमानुष मारहाण करणारे आरोपी अद्यापही फरारी आहेत.

बारामती : बारामती एमआयडीसीतील बाळकृष्ण पेपर मिलमधील परप्रांतीय कामगारांना अमानुष मारहाण करणारे आरोपी अद्यापही फरारी आहेत. या प्रकरणी कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार (दि. २२) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी; अन्यथा धरणे अांदोलनासह बारामती बंदचा इशारा निवेदनाद्वारे रिपाइं कार्यकर्त्यांनी केली आहे.औद्योगिक वसाहतीत या कंपनीत परप्रांतीय आठ कामगारांना डांबून ठेवून कंपनीचे मालक संतोष सिंग, मॅनेजर संजय सिंग, सुपरवायझर महावीर सिंग यांनी मारहाण केल्याची तक्रार आहे. तिघांविरुद्ध तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी फरारी आहेत. त्यामुळे या आरोपींना अटक करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ राऊत, रिपाइंचे तालुका अध्यक्ष मधुकर मोरे, युवकाध्यक्ष विश्वास भोसले, शहराध्यक्ष संजय वाघमारे, जिल्हा सरचिटणीस विजय सोनवणे, माऊली कांबळे, बाळासाहेब सरतापे, मयूर आढाव, सुरेश सोनवणे, अमोल जगताप, अजिंक्य भोसले, मंगलदास निकाळजे आदिंनी केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (बारामती ग्रामीण) डॉ. संदीप पखाले यांना निवेदन दिले आहे. आरोपींना अटक न केल्यास शुक्रवारी (दि. २७) पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करून शनिवारी बारामती बंदचा इशारा देण्यात आला आहे.