शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अबब.. पानटपरी चालकाला मागायचा तो दररोज ५०० रुपये हप्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:27 IST

२५ हजार रुपयांची खंडणी - गुंडाला कोंढवा पोलिसांनी केली अटक लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पान टपरीचालकाकडे दररोज ५०० ...

२५ हजार रुपयांची खंडणी - गुंडाला कोंढवा पोलिसांनी केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पान टपरीचालकाकडे दररोज ५०० रुपये याप्रमाणे २५ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी अटक केली. गेल्या वर्षभरापासून तो या पानटपरीचालकाकडून खंडणी वसुल करीत होता.

इम्तियाज दाऊद मेमन (वय ४५, रा. मिठानगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

याप्रकरणी रमजान रज्जाक खान (वय २३, रा. बाबाजान मशिदजवळ, शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान खान यांची सत्यानंतद हॉस्पिटलसमोर पान टपरी आहे. गेल्या एक दोन वर्षांपासून ते पान टपरी चालवितात. काही २-३ महिन्यांपासून मेमन याने खान यांना धमकावून पान टपरी चालवायची असेल तर मला दररोज ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, पैसे दिले नाही तर तुझी टपरी बंद करेन अशी धमकी तो देत होता. या धमकीला घाबरून रमजान खान हा गेले २ महिने त्याला हप्ता देत होता. आतापर्यंत त्याने २५ हजार रुपये मेमन याला दिले. आता मात्र त्याला पैसे देणे शक्य नसल्याचे त्याने सांगितल्यावर मेमनने त्याला धमकाविण्यास सुरुवात केली. शेवटी त्याने कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. इम्तियाज मेमन याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर अधिक तपास करीत आहे.