या स्पर्धेला सिंहगड रोड परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिली ते बारावी व एक खुला गट असे एकूण तेरा गटात ही स्पर्धा संपन्न झाली. एकूण ७० विजेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते मा अंकूश काकडे, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा स्वाती पोकळे, नगरसेविका आश्विनी पोकळे, मेजर नारायण पाटील सर,पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजयभ पारगे व सचिव अरूणभाऊ निवंगुणे,वरिस्ट ऊपाध्यक्ष दत्ताभाऊ पीसे,आधार सोशल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष चाकणकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी आधार सोशल ट्रस्ट पुरस्कृत सिंम्हा वाॅरिअर्स महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आधारच्या वतीने आयोजित ''''आधार प्रिमियम लिग ''''पुरूष क्रिकेट संघातील विजेत्या तीन टिमचे बक्षीस वितरण पार पडले. सूत्रसंचालन सोपान बंदावणे यांनी केले तर आभार संदीप काकडे यांनी मानले