शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पीएम किसान योजनेत सर्वांचे आधार बंधनकारक, अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार

By नितीन चौधरी | Updated: January 17, 2025 12:32 IST

येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

पुणे : राज्य सरकारच्या अॅग्रीस्टॅक योजनेतून आधार जोडणी आणि शेतकरी ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या २० हप्त्यांचा लाभ घेण्यासाठी आता कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार क्रमांक जोडणी बंधनकारक असून शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. ही अट जानेवारीअखेर देण्यात येणाऱ्या १९ व्या हप्त्याला लागू नसेल. त्यापूर्वी सध्या नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पती पत्नी तसेच कुटुंबातील १८ वर्षांखालील सदस्याची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या अटीमुळे एका पात्र कुटुंबात एकालाच लाभ देण्याची अंमलबजावणी होणार आहे.

पीएम किसान सन्मान योजनेत पात्र लाभार्थ्यांची संख्या ९६ लाख ६७ हजार इतकी आहे. त्यात भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या ९५ लाख ९५ हजार इतकी असून अजूनही ७८ हजार लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या नाहीत. तर ई केवायसी प्रमाणीकरण केलेल्यांची संख्या ९५ लाख १६ हजार इतकी आहे. तर अजूनही १ लाख ८९ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केलेले नाही.बॅँक खात्याशी आधार संलग्न करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ९४ लाख ५५ हजार असून अद्याप १ लाख ९८ हजार शेतकऱ्यांनी ही अट पूर्ण केलेली नाही. तसेच अर्जाला स्वयंमान्यता न दिलेल्यांची संख्या सुमारे ३६ हजार आहे. त्यामुळेच योजनेच्या १९ हप्त्यांसाठी राज्यातील ९२ लाख ४२ हजार शेतकरी पात्र ठरले आहेत. येत्या २५ जानेवारीनंतर महिनाअखेर हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने डिसेंबरमध्ये अॅग्रीस्टॅक योजनेची घोषणा केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक दिला जाणार आहे. यासह शेतकरी असल्याचा पुरावा देऊन त्याची जोडणी अधिकार अभिलेखालाही करण्यात येणार आहे. हे करताना शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत. ही योजना कृषी सहायक, तलाठी तसेच ग्रामसेवक यांच्या समन्वयातून राबविली जाणार आहे. सध्या यावर या तिन्ही कर्मचारी संघटनांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे योजना प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार जोडणी व शेतकरी ओळख क्रमांकाशिवाय पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेच्या १९ व्या हप्त्यासाठी ही अट लागू नाही. मात्र, २० हप्त्यांसाठी या बाबी बंधनकारक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या अटीची अंमलबजावणी करण्यापूर्वी नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता पती, पत्नीच्या आधार क्रमांकासह कुटुंबातील १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सदस्यांची आधार जोडणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे कुुटुंबातील एकाच सदस्याला लाभ देण्यात येणार आहे.