शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आबा बागूल यांनी अनेक विकासकामे केली आहेत, त्यांना आता मुंबईला पाठवा - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 05:33 IST

पुणे : विकासकामे करताना कल्पकताही असली पाहिजे. अशाच कल्पकतेने गेली सलग ३० वर्षे नगरसेवकपदाच्या माध्यमातून काम करून आबा बागूल यांनी अनेक विकासकामे उभी केली. आता त्यांना मुंबईला पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.पुणे नवरात्री महोत्सवांतर्गत शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिराला शरद पवार यांनी शनिवारी ...

पुणे : विकासकामे करताना कल्पकताही असली पाहिजे. अशाच कल्पकतेने गेली सलग ३० वर्षे नगरसेवकपदाच्या माध्यमातून काम करून आबा बागूल यांनी अनेक विकासकामे उभी केली. आता त्यांना मुंबईला पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.पुणे नवरात्री महोत्सवांतर्गत शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मीमाता मंदिराला शरद पवार यांनी शनिवारी भेट दिली. या वेळी बोलताना त्यांनी बागूल यांचे कौतुक केले. उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, चेतन तुपे, पुणे नवरात्री महोत्सवाचे पदाधिकारी, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. बागूल नागरिकांना काशीयात्रा घडवतात, त्याचबरोबर त्यांनी नागरिकांना जालियनवाला बाग, वाघा बॉर्डर येथेही घेऊन जावे, त्यातून देश समजण्यास मदत होईल, अशी सूचना पवार यांनी केली. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलचे कौतुक करत पवार यांनी बागूल यांनी उभ्या केलेल्या तारांगण प्रकल्पाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. घनशाम सावंत यांनी सूत्रसंचालन केले. नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी माता मंदिरात महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यात रोज रात्री पाककृती स्पर्धा व अन्य अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होत आहेत. तसेच गणेश कला, क्रीडा मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना बुधवारी (दि. २७) गणेश कला, क्रीडा मंदिर येथे महर्षी पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार