शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

सामूहिक सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:12 IST

संत निरंकारी मिशनच्या वतीने महाराष्ट्राच्या ५० व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर समागम स्थळावरच खारघर, नवी मुंबई येथे सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आयोजिलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध झाली.

हडपसर : संत निरंकारी मिशनच्या वतीने महाराष्ट्राच्या ५० व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची सांगता झाल्यानंतर समागम स्थळावरच खारघर, नवी मुंबई येथे सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात आयोजिलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ९९ जोडपी विवाहबद्ध झाली. यामध्ये पुण्यातील वधू वरांचाही समावेश आहे.वधू-वरांपैकी ४० वर आणि ४१ वधू मुंबईतील होत्या, तर ४४ वर आणि ४६ वधू महाराष्ट्राच्या अन्य भागातून आल्या होत्या. १४ वर आणि ११ वधू देशाच्या विविध राज्यांतील होत्या. ज्यामध्ये दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड, हरियाना, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. एक वर आणि एक वधू यू. एस. ए. वरून आले होते. शैक्षणिक व व्यवसाय या दृष्टिकोनातून पाहिले असता ३१ वर आणि २५ वधू पदवीधर आहेत. तर ५ वर आणि ११ वधू पदव्युत्तर पदवीधर आहेत. यातील वरांपैकी ६ इंजिनिअर व २ एमबीए आहेत, तर वधूंमध्ये २ इंजिनिअर, २ डॉक्टर व २ एमबीए आहेत. विशेष म्हणजे १८ वर व १३ वधू मिशनच्या बाहेरून आलेले होते. याचा अर्थ ३१ कुटुंबांनी संत निरंकारी मिशनच्या साध्या विवाह पद्धतीला पसंती दर्शवली. ३ वधू व ३ वर पुनर्विवाह करीत आहेत.विवाह सोहळ्याचा प्रारंभ निरंकारी मिशनच्या पारंपरिक ‘जयमाला’ आणि ‘सामायिक हार’ परिधान करण्याने झाला. त्यानंतर मधुर संगीताच्या चालीवर पवित्र मंत्रांच्या रुपात असलेल्या ४ ‘निरंकारी लावां’चे (मंगलाष्टका) गायन करण्यात आले. प्रत्येक ‘लावां’च्या शेवटी सद्गुरु माताजी व उपस्थित भाविक-भक्तगणांनी वधू-वरांवर पुष्पवर्षाव केला.सद्गुरु माता सविंदर हरदेवजीमहाराज यांच्या आशीर्वचनाने हा मनोहर सोहळा झाला. सद्गुरु माताजींनी नवदांपत्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुखसमृद्धीचे व्हावे, अशा शुभेच्छा देतानाच सत्संग, स्मरण आणि निष्काम सेवा करण्याची प्रेरणा प्रदान केली.