शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

अकरावीसाठी ९६ हजार ३२० जागा, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील २८५ महाविद्यालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 4:07 AM

अकरावी प्रवेशासाठीची यादी अखेर गुरुवारी सायंकाळी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली. यंदाच्या वर्षी अकरावीसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडमधील २८५ महाविद्यालयांमधून ९६ हजार ३२० जागा उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच हजारांनी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पुणे - अकरावी प्रवेशासाठीची यादी अखेर गुरुवारी सायंकाळी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने जाहीर करण्यात आली. यंदाच्या वर्षी अकरावीसाठी पुणे व पिंपरी- चिंचवडमधील २८५ महाविद्यालयांमधून ९६ हजार ३२० जागा उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच हजारांनी विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मागील वर्षी ९१ हजार ६७० जागा उपलब्ध होत्या. अकरावी प्रवेशासाठी बाहेरगावांहून आलेल्या विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांनी नेमके काय करावे, कोणत्या मार्गदर्शन केंद्रांना भेट द्यावी, माहितीपुस्तिका कुठून घ्यावी, याची माहितीच जाहीर न केल्याने विद्यार्थी संभ्रमात होते.यंदाच्या वर्षापासून अकरावी समितीने कला व सांस्कृतिक कोट्याअंतर्गत दिले जाणारे आरक्षण रद्द केले आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेतच हे वाढीव गुण मिळत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे. अकरावी समितीसाठी व महाविद्यालयांसाठी दर वर्षी अकरावीसाठी प्रवेशप्रक्रिया सारखीच असली, तरीही विद्यार्थ्यांसाठी मात्र ती दर वर्षी नवी असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक महाविद्यालयाने त्यांच्यासाठी हेल्पडेस्क सुरू करावेत अशा सूचना अकरावी केंद्रीय समितीने केल्या आहेत. हे हेल्पडेस्क सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत सुरूठेवावे, असेही सांगण्यात आले आहे.अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांचे पूर्ण शुल्क घेऊन प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांकडून डीडी स्वरूपात शुल्क भरण्याची मागणी करतात. त्यामुळे पालकांना नाहक त्रास होतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे शुल्क हे आॅनलाइन पद्धतीने किंवा तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करून; मग पूर्ण शुल्क भरायला सांगावे. जेणेकरून पालकांना नाहक त्राससहन करावा लागणार नाही, अशाही सूचना समितीने महाविद्यालयांना दिल्या आहेत.त्या अनुदानित महाविद्यालयांविरुद्ध संघटनेकडे तक्रार कराअकरावी केंद्रीय प्रवेश समितीने प्रत्येक विनाअनुदानित महाविद्यालयाने किती शुल्क घ्यावे किंवा त्या महाविद्यालयचे शुल्क किती आहे, हे माहितीपुस्तिकेत सांगितले आहे; मात्र अनुदानित महाविद्यालयांबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.शासनाच्या नियमानुसार प्रत्येक अनुदानित महाविद्यालयाने ३३० ते ३९० रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे. पुण्यातील अनुदानित महाविद्यालयांनी ३६० रुपये शुल्क घेणे अपेक्षित आहे.जी महाविद्यालये यापेक्षा जास्त शुल्क आकारतील त्यांच्याविरोधात आमच्या संघटनेकडे तक्रार करा,अशी भूमिका आता सिस्कॉम या संघटनेने घेतली आहे. त्यासाठी सिस्कॉम,निर्मल इंटरप्राइजेस, शॉप नं २, श्रीअनिकेत अपार्टमेंट, २९२ कसबा पेठ, पुणे ४११०११ यांच्याकडेतक्रार करावी, असे आवाहन संघटनेच्या संचालिकावैशाली बाफना यांनीकेले आहे. दरम्यान, याबाबत पालक व विद्यार्थ्यांनाशिक्षण विभागाकडेही दाद मागता येईल.अकरावीसाठी उपलब्धशाखानिहाय जागांची संख्याशाखा शाखा संख्या प्रवेश क्षमताकला (मराठी) ७० ८०६०कला (इंग्रजी) ६१ ५९४०वाणिज्य (मराठी) ९७ १३१००वाणिज्य (इंग्रजी) १६६ २५५६०विज्ञान (इंग्रजी) २२५ ३९०९०व्यावसायिक शिक्षण (मराठी) २७ ३०४०व्यावसायिक शिक्षण (इंग्रजी) १७ ४५७०एकूण जागा ९६, ३२०प्रवेशासाठीचे संकेतस्थळ

टॅग्स :collegeमहाविद्यालयnewsबातम्या