शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रगमाफिया ललित पाटील प्रकरणात ९ पोलिस निलंबित; २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 10:59 IST

ड्रग्ज विक्री प्रकरणात ४, तर ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यासह ५ जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट चालविणारा आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेल्या ललित पाटील प्रकरणी एका अधिकाऱ्यासह ९ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. ड्रग्ज विक्री प्रकरणात ४, तर ससूनमधून पलायन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यासह ५ जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

 ड्रग्ज रॅकेट प्रकरणात सहायक फौजदार जनार्दन काळे, पोलिस कर्मचारी विशाल ठोपले, स्वप्निल शिंदे आणि दिगंबर चंदनशिव यांना, तर पलायन प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश शिवणकर, पोलिस नाईक नाथाराम काळे, पिरप्पा  बनसोडे आणि अमित जाधव यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी अपर पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी वेगवेगळे आदेश काढले आहेत. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

ललित पाटील हा ड्रग्ज माफिया आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी कोर्ट पार्टी नियुक्त केली होती. दोन दिवसांपूर्वीच ससून रुग्णालयात २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडले होते. त्यात ललित पाटील हा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले होते. त्याच्याकडे दोन महागडे मोबाइल आढळून आले होते. अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेने ससून रुग्णालय व कारागृहाकडे पत्र दिले होते. या आरोपीच्या बंदोबस्तासाठी पोलिस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे व इतरांची नेमणूक केली होती. असे असताना  ललित पाटील याला एक्स-रे काढण्यासाठी तळमजल्यावर आणण्यात येत असताना पोलिसांच्या हाताला हिसका देऊन ताे पळून  गेला.