शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८१.४७ टक्के मतदान, शिरूर, वेल्हा, मावळमध्ये सर्वाधिक मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:56 IST

पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ८१.४७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिली.

पुणे : पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ८१.४७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिली.जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले. त्या खालोखाल वेल्हे तालुक्यात ९१.४० टक्के, मावळ तालुक्यात ९०.२० टक्के, पुरंदर तालुक्यात ८९.८९ टक्के, खेड तालुक्यात ८७.६५ टक्के, बारामती तालुक्यात ८५.५२ टक्के, आंबेगाव तालुक्यात ८५.०३ टक्के, भोर तालुक्यात ८३.६६ टक्के, दौंड तालुक्यात ८०.५९ टक्के, मुळशी तालुक्यात ७८.८५ टक्के, हवेली तालुक्यात ७८.१७ टक्के आणिजुन्नर तालुक्यात ७६.२९ टक्के मतदान झाले आहे.जिल्ह्यातील या ८९ ग्रामपंचायतीत झालेल्या निवडणुकीत स्त्री मतदार ९५ हजार ३२५ तरपुरूष मतदार १ लाख २ हजार८८८ असे एकूण १ लाख ९८ हजार१२३ मतदार होते. त्यापैकी स्त्रीमतदार ७६ हजार २२१, तरपुरूष ८५ हजार २६८ असेएकूण १ लाख ६१ हजार ४९१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.>मतदान प्रक्रिया शांततेतजिल्ह्यात सर्वाधिक जुन्नर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्याखालोखाल बारामती तालुका १५, मुळशी तालुका १४, हवेली आणि आंबेगाव तालुका प्रत्येकी ९, भोर तालुका ८, मावळ तालुका ७, वेल्हा तालुका ३, पुरंदर तालुका २, दौंड आणि शिरूर तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामपंचायत अशा जिल्ह्यात एकूण ८९ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगितले.सकाळी साडेसात ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत या ८९ ग्रामपंचायतीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.