शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

८० ट्रक बटाटावाण पडून, मंचरला लागवडीच्या क्षेत्रात मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 01:15 IST

मंचर : ढगाळ तसेच पावसाळी वातावरण होऊ लागल्याने रब्बीतील बटाटावाणाची मागणी कमी झाली आहे.

मंचर : ढगाळ तसेच पावसाळी वातावरण होऊ लागल्याने रब्बीतील बटाटावाणाची मागणी कमी झाली आहे. परिणामी, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी ग्राहकांअभावी शुकशुकाट पसरला आहे. मागणीअभावी मंचर बाजार समितीत ८० ट्रक बटाटावाण पडून आहे. यामुळे या वर्षी लगवड क्षेत्रात घट झाली असून, भविष्यात बटाटा उत्पादन कमी होणार आहे.रब्बी हंगामात या वर्षी खूपच कमी क्षेत्रात बटाटा लागवड झालेली आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आतापर्यंत जेमतेम ५५० ट्रक बटाटावाणाची विक्री झाली आहे. यापूर्वीची आकडेवारी पाहिली, तर डिसेंबरअखेर सव्वादोन हजार ट्रक बटाटावाण शेतकरी खरेदी करून त्याची लागवड करतो. बटाटावाणाला नीचांकी बाजारभाव आहे. क्विंटलला ५०० ते ७०० रुपये इतका कमी भाव असूनही शेतकरी बटाटा लागवड करण्यास धजावत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मागील दोन वर्षी शेतकºयांना बटाटापिकाने अडचणीत आणले आहे.एकीकडे ऊसपिकातून चांगला फायदा मिळत असताना बटाटापिकातून भांडवलसुद्धा वसूल होत नाही. उत्पादन कमी निघते; शिवाय बाजारभावसुद्धा कमी मिळतो. बटाट्याच्या बियाण्याचे बाजारभाव मागील वर्र्षी २,००० ते २,५०० रुपयांपर्यंत गेले होते. परिणामी, शेतकºयांना मोठे भांडवल गुंतवावे लागले. हे भांडवल वसूल झाले नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसला आहे. वातावरणातील बदल व लहरी निसर्गाचा फटका बटाटापिकाला बसतो आहे. त्यामुळे शेतकरी इतर पिकांकडे वळाला आहे, अशी माहिती व्यापारी संजय मोरे यांनी दिली.>वातावरणातील बदलाचाही फटका : बाजार समितीत शुकशुकाटकाही शेतकºयांनी धाडस करून बटाटा लागवड केली. अगाद लागवड झालेला बटाटापिकाची संततधार पावसामुळे उगवणच झाली नाही. नोव्हेंबर महिन्यात काही शेतकºयांनी बटाटा लागवड करण्याची तयारी केली होती. मंचर बाजार समितीत राज्यातील शेतकरी बटाटावाणाच्या खरेदीसाठी येऊ लागले होते. मात्र, चार दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. पावसाळी वातावरण होऊन काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या आहेत. पावसाच्या शक्यतेने शेतकºयांनी बटाटा लागवड करणे बंद केले आहे. परिणामी, मंचर बाजार समितीत पुन्हा शुकशुकाट पसरला आहे. व्यापाºयांना शेतकºयांची अक्षरश: वाट पाहण्याची वेळ आली आहे.>३५ ते ४० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड झाली आहे. लागवड क्षेत्र कमी झाल्याने यापुढे लागवड होऊन उत्पादित होणाºया बटाटापिकाला चांगला बाजारभाव मिळून शेतकºयांना नफा मिळेल, असा अंदाज व्यापारी बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. ८० ट्रक बटाटावाण बाजार समितीत पडून आहे. त्याला बाजारभाव कमी आहे.

टॅग्स :Puneपुणे