शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

७६ वर्षांच्या सरपंच आजी करणार गावाचा कारभार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 01:28 IST

अवघं तीन हजार लोकसंख्येचं गुळाणी गाव ! खेडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव सध्या सरपंच आजींमुळे चर्चेत आहे.

पुणे : अवघं तीन हजार लोकसंख्येचं गुळाणी गाव ! खेडपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव सध्या सरपंच आजींमुळे चर्चेत आहे. ७६ वर्षांच्या इंदूबाई हनुमंत ढेरंगे या गावच्या पहिल्या लोकनियुक्त सरपंच म्हणून गावगाडा हाकणार आहेत. आश्चर्य म्हणजे त्या पूर्ण अशिक्षित असल्या तरी गावात काय बदल करायचे आहेत, याबद्दल त्या जराही साशंक नाहीत. त्यामुळे वयासोबत मिळालेल्या सरपंचकीचा वापर करून त्या गुळाणीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.इंदूबाई संपूर्ण गावात ‘नानी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. गावापासून अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकळवाडीतील वाळुंज कुटुंब हे त्यांचे माहेर. आयुष्याचा सर्व काळ त्यांनी याच परिसरात घालवला आहे. त्यामुळे या भागातल्या गरजा आणि अडचणी त्यांना चांगल्याच माहिती आहेत. त्याच सोडवण्यासाठी आलेली संधी सोडायची नाही, असा निश्चय त्यांनी केला आणि सरपंचपदाची निवडणूक लढवली. त्याची कहाणी अशी, की सरपंचपदासाठी महिला राखीव आरक्षण पडले आणि उमेदवाराचा शोध सुरू झाला. शेतीत रमलेल्या गावच्या महिला ग्रामपंचायतीत येऊन कारभार करायला पुढे येईना. सुरुवातीला आजी नव्हे तर त्यांच्या सूनबाई निवडणूक लढवणार होत्या. पण मतदार यादीतून नाव वगळले गेल्याने त्यांचा पत्ता कट झाला आणि निवडणूक लढवण्याची संधी त्यांच्याकडे चालत आली. लांब पसरलेल्या वस्त्या आणि शेतामध्ये असलेल्या प्रत्येक घरात जाणे त्यांना जमले नाही. त्यामुळे त्यांच्या सुना, मुले प्रचार करीत होती. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले; पण त्यालाही खंबीरपणे तोंड देत आजी सरपंच झाल्या. घराबाहेर गुलाल उधळला, घोषणा झाल्या आणि आयुष्यातला सर्वांत आनंदाचा दिवस उगवल्याची जाणीव त्यांना झाली.‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘आता गावासाठी रस्ते करायची इच्छा आहे. गावच्या आयाबायांची पाण्याची वणवण थांबवायची आहे. पाणी नसल्याने वर्षातून दोन पिकं घेता येतात. त्यामुळे पाईपलाईनने पाणी आणायचं आहे. त्यासाठी मी राजकारण करेन आणि इतकं चांगलं काम करेन, की कोणाच्याही लेकी-सुना पुन्हा सरपंच व्हायला नाही म्हणणार नाहीत.’’

टॅग्स :WomenमहिलाWomen's Day Specialजागतिक महिला दिन