शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

७५० जणांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: October 8, 2014 05:29 IST

‘रेल रोको’ आंदोलन करून दगडफेक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे व पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे साडेसातशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पिंपरी : ‘रेल रोको’ आंदोलन करून दगडफेक केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे व पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे साडेसातशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांपैकी ११ जणांना अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. सोमवारी दुपारी किरकोळ कारणावरुन पिंपरी रेल्वेस्थानकावर शेकडो नागरिकांनी बेकायदारीत्या एकत्रित येऊन ‘रेल रोको’ आंदोलन केले. यामुळे तब्बल तीन तास रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. दरम्यान, दगडफेकही केली. सरकारी मालमत्तेचे नुकसान करीत सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच वातावरणात तणाव निर्माण झाला. दरम्यान, समाजात चुकीचा संदेश पसरवून भावना भडकाविणे, बेकायदा जमाव जमविणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे या कलमांतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात सुमारे दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. जे. शेख यांनी दिली. तर रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे सहाशे जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. दंगल करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे या कलमांतर्गत पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात सुमारे सहाशे जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अकरा जणांना अटक केली असून, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दिली.