शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर दोन वेळा बायपास झालेल्या ७४ वर्षीय पैलवानाची कोरोनावर मात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:56 IST

डॉक्टरही झाले आश्चर्यचकित

ठळक मुद्देजगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व उर्मी त्यामुळे कोरोनाला हरवून जीवनाची कुस्ती पुन्हा जिंकली

माळेगाव खुर्द: कोरोनाला हारवण्यासाठी सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाची गरज असते. अनेकांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटना ऐकण्यात येत आहेत. पण त्याचबरोबर प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावरही लोकांनी कोरोनावर मात केली आहे. बारामती तालुक्यातील पैलवान दादासो बडे त्यापैकीच एक आहेत.

बडे आयुष्याचा गाडा हाकताना दोनदा बायपास सर्जरी झाली. मात्र प्रचंड कष्ट, संकटाला सामोरे जाण्याची क्षमता आदीच्या जोरावर या आजारावर मात करून दुग्ध व्यवसाय चालू ठेवला. काही दिवसांपूर्वी त्यांना डेंगुचा आजार झाला होता. त्यावरही यशस्वीरित्या मात केली. पण पुन्हा तब्येत बिघडल्याने त्यांनी कोरोना तपासणी केली. अखेर कोरोनाने त्यांना गाठले. त्याबरोबरच निमोनिया झाल्याचे निष्पन्न झाले. 

बारामती येथील डाॅ.गोकुळ काळेच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. डॉक्टरांनी कुटुंबाकडून त्यांची आरोग्यविषयक माहिती घेतली. व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासेल असेही सांगितले. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले.या सर्व घडत असताना पैलवान बडे मात्र निर्धास्त होते. मला काही होणार नाही? मी आजाराला घाबरत नाही? डॉक्टर तुम्ही उपचार करा असे सांगणारे पैलवान बडे आठ दिवसातच ठणठणीत बरे झाले. या आठ दिवसात डॉक्टरांनीही मेहनत घेतली. पैलवान बडेंच्या कुटुंबाकडून योग्य काळजी घेतली गेली. सकाळी नाष्ट्याला उपमा किंवा शिरा यासोबतच सकस व पौष्टिक आहार देऊन देखभाल केली. खरे तर दादासो बडे यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर सुध्दा अचंबित झाले आहेत. कारण जिथं रुग्ण बचावण्याची शक्यता कमी असताना रुग्णाच्या आत्मविश्वासाच्या जोरावर पुन्हा उभारी घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

"मी कोरोनाची भिती बाळगली नाही.योग्य आहार घेतला.पैलवानकीचे शरीर आहे.काय होणार नाही हा विश्वास होता. जगण्याची प्रचंड इच्छाशक्ती व उर्मी होती.त्यामुळे कोरोनाला हरवून जीवनाची कुस्ती पुन्हा जिंकली." असे बडे यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBaramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस