शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

७२ वर्षांनंतर आज स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय, तृतीयपंथीयांकडून ध्वजवंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:41 IST

दिवस १५ आॅगस्ट २०१८, वेळ : सकाळी ८ वाजता, ठिकाण : गरुड गणपती चौक, पुणे. ध्वजवंदन करण्याची तयारी पूर्ण झालेली. गरुड गणपतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या रांगोळ्या घालून ध्वजस्तंभ सजवला होता.

पुणे -  दिवस १५ आॅगस्ट २०१८, वेळ : सकाळी ८ वाजता, ठिकाण : गरुड गणपती चौक, पुणे. ध्वजवंदन करण्याची तयारी पूर्ण झालेली. गरुड गणपतीच्या कार्यकर्त्यांनी फुलांच्या रांगोळ्या घालून ध्वजस्तंभ सजवला होता. अचानक दोन व्यक्ती आल्या. त्यांना बघून अनेक जण थांबले. पण कोणाकडेही लक्ष न देता त्या दोघींनी थेट ध्वजवंदन केलं आणि आयुष्यातला परमोच्च क्षण अनुभवला.या दोन व्यक्ती होत्या पुण्यातील तृतीयपंथीयांच्या गुरू पन्नागुरु आणि तृतीयपंथी चांदणी गोरे. या दोघींच्या हस्ते काल गरुड गणपती मंडळाने ध्वजवंदन केले. समाजव्यवस्थेने अजूनही ज्यांना पूर्ण स्वीकारलेले नाही अशा तृतीयपंथीयांच्या हस्ते गरुड गणपती ट्रस्टने केलेले ध्वजवंदन नक्कीच कौतुकास पात्र ठरले आहे. या कृतीमुळे भारावून गेलेल्या या दोघींनी आज ७२ वर्षांनंतर समानतातत्त्वाचे अनुकरण करत आम्हाला समाजाने स्वीकारले असल्याची भावना व्यक्त केली. चांदणी यांनी तर आज ७२ वर्षांनंतर आम्हाला स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय अशी बोलकी प्रतिक्रिया दिली. याबाबत गरुड गणपती मंडळाचे अध्यक्ष सुनील कुंजीर म्हणाले की, तृतीयपंथीयांना समाजाने स्वीकारावे यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला. अनेकदा तृतीयपंथीयांना बघून आपण लांब जातो, त्यांना बघून रस्ता बदलतो. हेच संस्कार पुढच्या पिढीवर पण होत असतात. त्यांच्यावर निसर्गाने अन्याय केला असून आपण करण्याची गरज नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या हस्ते ध्वजवंदन केले.

टॅग्स :PuneपुणेIndependence Dayस्वातंत्र्य दिवस