शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

ध्वनिप्रदूषणाचा ७१ मंडळांवर ठपका

By admin | Updated: September 17, 2016 00:59 IST

शहरातील गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले़ न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत

पिंपरी : शहरातील गणेशोत्सवात अनेक गणेश मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले़ न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत उंचच उंच डीजेच्या भिंती लावत बाप्पाला निरोप देण्यात आला़ त्यामुळे गणेशोत्सवात परिमंडळ तीनच्या हद्दीतील ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७१ मंडळांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी दिली. गेल्या ११ दिवसांपासून गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असताना, शहरातील काही ठरावीक गणेश मंडळे वगळता अनेक मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केले़ ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा आदेश न्यायालयाने दिलेला होता़ त्यानुसार ११ दिवसांमध्ये शहरातील चतु:शृंगी १, सांगवी १०, हिंजवडी ७, वाकड २०, पिंपरी २१, भोसरी ७, निगडी ४, चिंचवड १ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मंडळांवर कारवाई करण्यात आली़ न्यायालयाच्या आदेशानुसार ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून ध्वनिमर्यादा कमी ठेवण्याचे आदेश होते़ मात्र, शहरातील गणेश मंडळांनी न्यायालयाचा आदेश धुडकावून डीजेचा आवाज मोठा करीत बाप्पांना निरोप दिला़ शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी नियम तोडल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती तेली यांनी दिली़ पिंपरी, वाकड, सांगवी, भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळानी ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केले़ मात्र, एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत एकाही गणेश मंडळाने नियमाचे उल्लंघन केले नसल्यामुळे हद्दीतील मंडळांचे कौतुक होत आहे़अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमांचे उत्तम नियोजन केले होते़ काही किरकोळ प्रकार वगळता शेवटच्या काही तासांमध्ये कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव डीजेचा आवाज वाढविल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)