शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 05:52 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक सुरक्षारक्षकांनी बुधवारी पकडले. विद्यापीठातीलच एका कर्मचा-याने परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बेकायदेशीरपणे राडारोडा टाकणारे ७ ट्रक सुरक्षारक्षकांनी बुधवारी पकडले. विद्यापीठातीलच एका कर्मचाºयाने परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकाराने विद्यापीठात खळबळ उडाली असून, याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तसेच याची चौकशी करण्यात येत असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दुपारी अचानक राडारोडा भरलेले ७ ट्रक एकापाठोपाठ एक आले. गस्तीवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्या ट्रकचालकांकडे चौकशी केली असता सेवक वसाहतीमध्ये हा राडारोडा टाकण्यासाठी सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा राडारोडा टाकण्यास कुणी सांगितले आहे, याची विचारणा केली असता त्या ट्रकचालकांना त्याचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे सर्व ७ ट्रकचालकांना अधिक चौकशीसाठी सुरक्षा विभागाच्या मुख्य कार्यालयात घेऊन जाण्यात आले.सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी स्थावर विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी कोणताही राडारोडा मागविला नसल्याचे तसेच त्या ७ ट्रकशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता विद्यापीठातीलच एका कर्मचाºयाने पैसे घेऊन हा राडारोडा टाकण्यास सांगितल्याची माहिती पुढे आली आहे. सुरक्षा अधिकाºयांकडून त्या दिशेने तपास करण्यात येत आहे.विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी नुकतेच नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅम्पसमध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तरीही भरदिवसा हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये काही वर्षांपूर्वी एका सुरक्षारक्षकाचा खून झाल्याची गंभीर घटना घडली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.कर्मचा-यांकडून केले जातेय ब्लॅकमेलएका कर्मचा-याकडून परस्पर पैसे घेऊन हा राडारोडा टाकायला लावल्याच्या पार्श्वभूमीवरच विद्यापीठामध्ये काही कर्मचाºयांकडून अधिका-यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या कर्मचाºयांकडून तुमच्याविरुद्ध तक्रार आल्याचे सांगून कधी थेट पैशांची मागणी केली जाते, तर कधी उसने पैसे घेऊन ते परत न देता लुबाडले जात असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्याचबरोबर विद्यापीठात विविध प्रकारची कामे करणाºया ठेकेदारांना धमकावून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे करण्यात आल्या़ आहेत़वरिष्ठ अधिका-यांमध्ये दहशतसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांना कर्मचाºयांकडून ब्लॅकमेल करून अनेकांना त्रास दिला जात असल्याची सर्व माहिती आहे. मात्र, या कर्मचाºयांवर कारवाई करण्याचे धाडस अद्याप विद्यापीठातील एकही अधिकारी करू शकलेला नाही. कामावर न जाता केवळ हजेरी लावणे, पत्नी, मुलगा यांची विद्यापीठात वर्णी लावण्यासाठी दबाव टाकणे असे अनेक गैरप्रकार सर्रास सुरू आहेत. मात्र वरिष्ठ अधिकाºयांमध्ये या कर्मचाºयांची दहशत असल्याने गेल्या अनेक वर्षांत त्यांच्याविरुद्ध कुणीही कारवाई करू शकलेले नाही.चंदनाच्या झाडांची चोरीविद्यापीठ कॅम्पसमध्ये अनेक चंदनाची झाडे आहेत. या झाडांची रात्रीच्या वेळेस चोरी करण्यात येत असल्याचे प्रकार उजेडात येत आहेत. मात्र, विद्यापीठ कॅम्पसमध्ये नेमकी किती चंदनाची झाडे आहेत याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे अनेक झाडांची चोरी झाली असली तरी त्यांची माहिती सुरक्षा विभागाला होत नसल्याचे दिसून आले आहे.....त्याचा शोध घेऊसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये टाकण्यात आलेला राडारोडा कोणाच्या सांगण्यावरून टाकण्यात आला याचा शोध घेतला जात आहे. स्थावर विभागाला या राडारोड्याची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे.- सुरेश भोसले,संचालक, सुरक्षा विभाग

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ