शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कन्हेरसर ते झोडकवाडी रस्ते पुलासाठी सात कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:09 IST

कन्हेरसर ते झोडकवाडी या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम व्हावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी माजी ...

कन्हेरसर ते झोडकवाडी या रस्त्याची दुरावस्था झाल्याने या ठिकाणी रस्ते व पुलाचे काम व्हावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे केली होती. याकामी आढळराव पाटील यांनी तत्कालीन युती शासनाकडे तसेच जिल्हा वार्षिक आराखड्यातून कामाला मंजुरी मिळावी यासाठी आग्रह धरला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन रामा १०३ कन्हेरसर ते झोडकवाडी-मुक्ताईनगर रस्ता सुधारणा करणे कामासाठी ३ कोटी १२ लक्ष निधीला २०१९ मध्ये मंजुरी मिळून नुकतीच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली. याचबरोबर कन्हेरसर ते झोडकवाडी पुल बांधणे रु. ३ कोटी ८८ लाख या कामाला १५ मार्च २०२० रोजी मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात या कामाचीदेखील निविदा प्रक्रिया पूर्ण होईल असे माजी खासदार आढळराव पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले.

यावेळी पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव, पाबळ उपसरपंच राजाराम वाघोले, कन्हेरसर वि. का. सोसायटीचे चेअरमन एकनाथ दौंडकर, कन्हेरसरचे माजी सरपंच संदीप दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब खरपुडे, कन्हेरसर ग्रा. पं. सदस्य रुपेश दौंडकर, शिवसेना विभागप्रमुख संतोष दौंडकर, पाबळ ग्रा.पं. सदस्य सचिन वाबळे, दिलीप दप्तरी, भगवान लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ झोडगे, रामदास आगरकर, अनिल जाधव, महेश सिनलकर, आदी उपस्थित होते.

फोटो ओळ: कन्हेरसर व पाबळ ग्रामस्थांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे आभार व्यक्त केले.