शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयाला ६८ कलाकार अनुपस्थित राहणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 15:47 IST

आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने कलाकारांमधून तीव्र नाराजी

 पुणे : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयामध्ये केवळ ११ पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिले जाणार असून, उर्वरित पुरस्कार माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कलाकारांकडून आक्षेप घेण्यात आल्यानंतर शेखर कपूर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार नसल्याने ६८ कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार टाकत अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे थोड्याच वेळात नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात वितरण होणार आहे. गेल्या ६४ वर्षांपासून हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते वितरीत करण्याची परंपरा आहे. व्यस्त वेळापत्रकामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळा संपेपर्यंत उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या हस्ते अकराच पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. उर्वरित पुरस्कार हे माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते दिले जाणार आहे. यामुळे राष्ट्रीय पुरस्कारावर आपल्या कलेची मोहर उमटविणा-या कलाकारांनी शासनाच्या अनागोंदी कारभारावर टीका केली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता हा निर्णय घेण्यात आल्याने कलाकारांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आपले म्हणणे शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी कलाकारांनी आपल्या स्वाक्षरीचे पत्रही दिले. यानंतरही शासनाकडून या निर्णयात कोणताही बदल करण्यात न आल्याने ६८ कलाकारांनी पुरस्कार सोहळयावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची भूमिका असलेला ‘कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना ‘पावसाचा निबंध’ या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. अमर देवकर दिग्दर्शित ‘म्होरक्या’ या सर्वोत्कृष्ट बालचित्रपट ठरला आहे. ..................

टॅग्स :PuneपुणेNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Ramnath Kovindरामनाथ कोविंदPrasad Oakप्रसाद ओक