शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील ६६ हजार कुटुंब अनुदानाच्या प्रतीक्षेत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 04:13 IST

जिल्हा हगणदरीमुक्त होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील तब्बल ६६ हजार २४४ कुटुंबांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. पुणे जिल्हा हगणदारीमुक्त होऊन आठ महिने झाले आहेत. राज्य शासनकडून या उपक्रमासाठी अनुदान देण्यात येते.

पुणे - जिल्हा हगणदरीमुक्त होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील तब्बल ६६ हजार २४४ कुटुंबांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. पुणे जिल्हा हगणदारीमुक्त होऊन आठ महिने झाले आहेत. राज्य शासनकडून या उपक्रमासाठी अनुदान देण्यात येते.जिल्हा परिषद सदस्यांमध्ये गट हगणदरीमुक्त करण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे. शौचालय नसणाºया कुटुंबांचे वीज, पाणीपुरवठा खंडित करावे आणि रेशनिंगवरचे धान्य देऊ नये, अशा सूचनादेखील जिल्हा परिषदेने गटविकास अधिकाºयांना दिल्या होत्या. उघड्यावर शौचालय करणाºयांवर पोलीस किंवा ग्रामसेवकांनी कारवाई केली होती. गावनिहाय गुडमॉर्निंग पथकांची नेमणूक करण्यात आली होती. वैयक्तिक शौचालये बांधल्यास तत्काळ अनुदान दिले जाईल, असे आश्वासन अधिकाºयांनी नागरिकांना दिले होते. यामुळे अनेक कुटुंबांनी कर्ज काढून शौचालये बांधली होती. मात्र, अद्याप ६६ हजार कुटुंबांना अनुदान मिळाले नाही.जिल्हा परिषदेने जिल्ह्यात १ लाख ६८ हजार ३५ शौचालये बांधण्याचे ३१ मार्च २०१७ अखेर लक्ष्य ठेवण्यात आले होते. जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून वर्षभर विविध उपक्रम राबविले होते. शौचालय नसणाºया कुटुंबांचे प्रबोधन, फ्लेक्सद्वारे जनजागृती, नागरिकांच्या गृहभेटी, विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांचे प्रबोधन करण्याची मोहीम घेतली होती.शासनाकडेपाठपुरावा सुरूवैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासाठी जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ८९९ कुटुंबे शौचालयाच्या अनुदानास पात्र आहेत. यापैकी ९२ हजार ६५५ जणांना अनुदानाचे वापट करण्यात आले आहे. अद्यापही ६६ हजार २४४ कुटुंबे अनुदान देणे बाकी आहे. यासाठी ७९ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या अनुदानासाठी शासनाचा पाठपुरावा करत आहे, असे याबाबत जिल्हा परिषदेतील अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे