शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बालमजुरी कायद्याची ६४ टक्के बालकांना नाही माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 03:44 IST

बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

- विवेक भुसेपुणे  - बालकांच्या विकासासाठी त्यांना कामाला जुंपणे हा कायद्याने गुन्हा आहे़ मात्र, पुण्यातील १३ ते १७ वयोगटातील ६४ टक्के मुलांना असा काही बालकामगार कायदा अस्तित्वात आहे, याची काहीही माहिती नसल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे़ जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त बालहक्क कृती गट (आर्क) यांच्या वतीने पुणे शहरातील येरवडा, विश्रांतवाडी, औंध, बिबवेवाडी व इतर विविध वस्त्यांमधील मुलांसमवेत बाल कामगार विषयावर गट केंद्रित चर्चा करून त्यांच्या सदस्य संस्थेच्या सहकार्याने एक सर्व्हे केला़ त्यात बालकांसाठी असलेल्या अनेक बाबींची मुलांनाच कल्पना नसल्याचे दिसून आले़आंतरराष्ट्रीय कामगार संघाने १२ जून हा जागतिक बालमजुरीविरोधी दिवस म्हणून २००२पासून पाळण्यास सुरुवात केली आहे़बालसंरक्षण हक्क म्हणजे काय हे सांगता येईल का? असे विचारल्यावर केवळ ३७ टक्के बालसंरक्षण म्हणजे काय या बद्दल माहिती होती़ ६३ टक्के मुलांना बालकांना स्वत:च्या संरक्षणासंबंधी कायदेशीर तरतुदीबद्दल माहिती नसल्याचे निदर्शनास आले़७१ टक्के बालकांनी बालमजूर किंवा मजुरी करताना पाहिले आहे़ तसेच ८४ टक्के मुलांनी बालमजुरी अयोग्य आहे, असे सांगितले़ १२ टक्के मुलांना बालमजुरी योग्य वाटते़ बालकामगार कायद्याविषयी माहिती आहे का? असे विचारल्यावर ६४ टक्के मुलांना बालमजुरी कायदा अस्तित्वात आहे, हे माहिती नव्हते़ २२ टक्के मुलांना बालमजुरी कायद्याबद्दल माहिती होती तर, १४ टक्के मुले काहीच सांगू शकली नाहीत़ एकूण ७८ टक्के मुलांना बालहक्क कायद्याबद्दल जाणीव जागृती होण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे़ आर्कतर्फे करण्यात आलेले हे सर्वेक्षण कामगार उपायुक्तांना मंगळवारी सर्व बालकांसह जाऊन देण्यात येणार असल्याचे आर्कचे समन्वयक सुशांत सोनोने यांनी सांगितले़ यामध्ये न्यू व्हिजन, आयएससी, होप, केक़े़पीक़े़पी., निर्माण, स्वाधार आणि आयडेंटी फौंडेशन यांनी सहभाग घेतला होता़ त्यात १३ ते १७ वयोगटातील १७१ मुलांनी भाग घेतला़७३ टक्के बालकांना बालमजुरीमुळे बालकांच्या विकासावर परिणाम होऊन त्यांना खेळ, झोप आणि आराम यापासून वंचित राहावे लागते़ ४६ टक्के मुलांना आईवडिल जेकाम करतात, ते आपण करण्यात काही चूकवाटत नाही़नातलग किंवा पालक बालमजुरीचे समर्थन करत असतील तर त्यांना दंड लागणे योग्य आहे का?, असे विचारल्यावर ८८ टक्के मुलांनी असा दंड करणे योग्य वाटते, असे उत्तर दिले़

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या