शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत ६०१ सदनिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 03:35 IST

पंतप्रधान आवास प्रकल्प : राज्यस्तरीय मूल्यमापन समितीकडून हिरवा कंदील

पिंपरी : महापालिकेतर्फे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत असून, शहरात १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी चºहोली, बोºहाडेवाडी आणि रावेतनंतर आणखी पिंपरी वाघेरे येथील ६०१ सदनिकांचा आवास प्रकल्पाच्या आराखड्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने मंजुरी दिली आहे.महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार इमारती बांधण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश सर्वच नागरिकांना व अर्जदारांना या योजनेत सदनिका उपलब्ध होणार आहे. शहरातील पिंपरी वाघिरे येथील आरक्षण क्रमांक ७७ येथे ३७० घरे व आरक्षण क्रमांक ७९ येथे २३१ घरे बांधणेच्या प्रकल्पाचा डीपीआर म्हाडा कार्यालय मुबंई यांच्याकडे ९ मे २०१८ रोजी पाठविला होता. त्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय मूल्यमापन समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पिंपरी वाघेरे येथील जागेत देखील आवास योजनेंतर्गंत सदनिकांचे काम सुरू होणार आहे.शहरात १० ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी चºहोलीत १ हजार ४४२, रावेतमध्ये १ हजार ८०, बोºहाडेवाडीमध्ये १ हजार ४०० आणि आकुर्डीमधील ५०० सदनिकांच्या प्रकल्पांचे प्रकल्प आराखडे मंजूर झाले आहेत. त्यापैकी चºहोली व रावेत येथील इमारत उभारण्याचा कामे स्थायी समितीने मंजूर केलेले आहेत. बोºहाडेवाडीची निविदाप्रक्रिया सुरू आहे. इतर प्रकल्पांच्या कार्यवाहीला गती दिली जाणार असून, लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती सत्तारुढ गटनेते एकनाथ पवार यांनी दिली.

टॅग्स :Homeघरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड