शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या बंधूसाठी सर्वपक्षीय ६ उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 21:27 IST

व्यवस्थापन परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी काम करण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिसभा सदस्यांना डावलून पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रसेनजित फडणवीस यांना पदवीधर गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शनिवारी मतदान  पदवीधर सदस्यांच्या खुल्या गटातील एका जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले होते.गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री कार्यालयातून अचानक सुत्रे हलली अन सर्वपक्षीय सहाही उमेदवारांनी प्रसेनजित यांच्यासाठी माघार घेतली आहे.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू प्रसेनजीत फडणवीस यांच्यासाठी सर्वपक्षीय ६ उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे व्यवस्थापन परिषदेवर ते बिनविरोध निवडून आले आहे. अधिसभा निवडणुकीमध्ये प्रसेनजित फडणवीस यांना निसटता विजय मिळाला होता, यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जोरदार फिल्डिंग लावून प्रसेनजित यांना बिनविरोध निवडून आल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळामध्ये रंगली आहे.  अर्ज माघारीनंतर व्यवस्थापन परिषदेच्या प्राचार्य खुला गट, प्राध्यापक खुला गट, व्यवस्थापन परिषद खुला गट यासाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी शनिवारी १७ मार्च रोजी २०१८ रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत मतदान पार पडणार आहे. अधिसभेचे सदस्य त्यासाठी मतदान करतील. प्राचार्य खुला गटातून मनोहर चासकर व व्हि. बी. गायकवाड, प्राध्यापक गटातून महेश अबाळे व कानू गिरमकर यांच्यात लढत होत आहे. संस्था प्रतिनिधी गटातून शामकांत देशमुख व सोमनाथ पाटील यांच्या लढत होत आहे. वरिष्ठ अधिसभा सदस्यांमध्ये नाराजी व्यवस्थापन परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी काम करण्याचा अनुभव असलेल्या वरिष्ठ अधिसभा सदस्यांना डावलून पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रसेनजित फडणवीस यांना पदवीधर गटातून उमेदवारी देण्यात आली. त्याचबरोबर त्यांना बिनविरोध निवडूनही आणण्यात आले आहे.  मात्र , त्यामुळे वरिष्ठ अधिसभा सदस्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून आलेले पदवीधर, संस्था प्रतिनिधी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्यातून व्यवस्थापन परिषदेवर प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीच्या अर्ज माघारीसाठी आज शेवटचा दिवस होता. पदवीधर सदस्यांच्या खुल्या गटातील एका जागेसाठी ७ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.प्रसेनजित यांच्यासह अनिल विखे, संतोष ढोरे, अभिषेक बोके, दादाभाऊ शिनलकर, तानाजी वाघ, बागेश्री मंठाळकर या मातब्बर उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या पदवीधर गटाची निवडणूक सर्वाधिक चुरशीची बनली होती. मात्र गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री कार्यालयातून अचानक सुत्रे हलली अन सर्वपक्षीय सहाही उमेदवारांनी प्रसेनजित यांच्यासाठी माघार घेतली आहे.यापार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेच्या निवडणूकीत त्यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी मोठी फिल्डिंग लावण्यात आली. अधिसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढलेल्या पॅनेलना व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद यामध्ये संधी देण्याचा शब्द देऊन या माघारी घडवून आणण्यात आल्या.प्रसेनजित यांच्यासह व्यवस्थापन परिषदेवर पदवीधर (एनटी गटातून) विजय सोनावणे, प्राचार्य (ओबीसी गटातून) संजय चाकणे, प्राध्यापक गटातून विलास उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस