शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 19:50 IST

महापालिकेच्या नवीन सुधारीत क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळांडूना देण्यात येणा-या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडूचे अर्ज पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देनवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी सुरु ; ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती सन २०१९-२० वर्षांसाठी शहरातील १०१ खेळाडूने शिष्यवृत्तीसाठी केले होते अर्ज

पुणे: महापालिकेच्या नवीन सुधारीत क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळांडूना देण्यात येणा-या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडूचे अर्ज पात्र ठरले आहेत. सन २०१९-२० वर्षांसाठी शहरातील १०१ खेळाडूने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. गुरुवारी (दि.१) रोजी झालेल्या क्रीडा समितीच्या बैठकीत पात्र खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यास मान्याता देण्यात आली, अशी माहिती क्रीडा समितीचे अध्यक्ष राहूल भंडारे यांनी दिली. महापालिकेकडून शहरातील उल्लेखनीय कामगारी करणा-या उद्योन्मुख खेळाडूंना ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे १०० अर्ज आले होते. त्यातील ५२ अर्ज पात्र झाले असून उर्वरित ४८ अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र, अनेक खेळाडूंना महापालिकेने दिलेल्या वेळेत कागदपत्रे सादर न करता आल्याने त्यांनी शहरासाठी योगदान देऊनही या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच काही खेळाडूंनी महापालिकेने मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही केलेली होती. त्यानंतर, ज्या खेळाडूंकडे कागदपत्रे आहेत. मात्र, केवळ मुदतीत ती त्यांना देता आली नाहीत. त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती खेळाडूंना व्हावी यासाठी क्रीडा विभागाकडून या खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्याचा निर्णय घेत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीचा फायदा आणखी ७ खेळाडूंना झाला असून या शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र झाले असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, या खेळाडूंना जिल्हास्तर ते आंतराष्ट्रीय खेळाडू अशा गटात विभागून दहा हजार ते ५० हजार रूपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. --------------------  सुधारीत क्रीडा धोरणामुळे खेळाडूंना फायदाशहरामध्ये क्रीडा संस्कृती अधिक प्रमाणात रुजविण्यासाठी सन २०१३ मध्ये महापालिकेने स्वंतत्र क्रीडा धोरण तयार केले. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने महापालिकेने सुधारीत नवीन क्रीडा धोरणास मंजुरी दिली. या नवीन क्रीडा धोरणाचा शहरातील खेळाडूना चांगला फायदा होणार असून,  या धोरणात केलेल्या बदलामुळेच ही शिष्यवृत्ती देणे शक्य झाले आहे. या सुधारीत धोरणाच्या माध्यमातून भविष्यात जास्तीत जास्त खेळाडूंना आर्थिक सहकार्य मिळण्यास मदत होईल. - राहूल भंडारे, अध्यक्ष, क्रीडा समिती  

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका